उभी रातराणी
किती डौलदार
सदैव भासते
ती बहारदार
होता सांजवेळ
सुरु बहरणे
सांजच्या दिव्याला
तिचे गंधाळणे
वाढता काळोख
मंद दरवळ
झुळुक पसरे
तिचा परिमळ
पहा अंगणात
फुले रातराणी
जणु गोड गाई
प्रीतीचीच गाणी
गंध दरवळ
मोहवी मनाला
मन हे आतुर
भेटण्या क्षणाला
रातराणी सांगे
झाली सांजवेळ
नभांगणी पहा
चंद्रमाचा खेळ
पहा रातराणी
सावळी गंधात
भासे उतरले
तारे अंगणात
करि सुगंधित
पहा रातराणी
मज सांगे कशी
नीज आता राणी
2
अष्टाक्षरी रातराणी
गंधाळली रातराणी**
परसात रातराणी
उभी कशी डौलदार
असो किती दुजी फुले
सदा ती बहारदार
होता सांजवेळ रोज
सुरु होते बहरणे
तिन्ही सांजचा दिव्याला
परिमल गंधाळणे.
जसा वाढतो काळोख
वाढे मंद दरवळ
थंड वा-याची झुळूक
पसरतो परिमळ
आसमंत सुगंधित
केला पहा रातराणी
आता मज सांगे कशी
नीज गात गोड गाणी
वैशाली वर्तक
3 मोगरा
मोगरा*
पानातून डोकावून हसे
टपोरा फुललेला मोगरा
शुभ्र पांढ-या रंगात
पाहून चेहरा होतो हसरा
मोहक गंधित मोगरा
हसे पाना पानात
गंध दरवळे तयाचा
गंधित आसमंत क्षणार्धात
रुपे मोहकमोहवतो
हा सुगंधी मोगरा
गंध पसरे सभोवती
मन होते गुंफण्या गजरा
नारी नेमाने माळीती
येता जाता प्रसंगात
मानी सौभाग्याचे वाण
देण्या चैत्री हळदी कुंकुवात
हा सुगंधी मोगरा
हवा सदैव गजरा
मन रहाते प्रसन्न
पहा वळती नजरा
वैशाली वर्तक
4 सदाफूली
प्रेमाची अक्षरे बालगीत
णकारी
दूर करी सहज मधुमेह
अशी तुझी ख्याती न्यारी
शोभा वाढविण्या अंगणाची
नितांत भासे तुझीच गरज
कमी पाणी असता देखील
बहरते तू नेहमी सहज
वैशाली वर्तक
5 गुलाब
काव्स्पंदन राज्य स्तरीय स्पर्धा
विषय- गुलाब
*स्पर्धेसाठी*
फुले विविध
दिसे बहुरंगी मोहक
तयात चित्तवेधक
गुलाबाचे 1
फुल गुलाबाचे
सर्व फुलात शोभिवंत
गंध दरवळे
आसमंत 2
गुलाबाच्या रोपांना
म्हणती जन ताटवे
गाती गोडवे
गुलाबाचे 3
सर्व फुलात
गुलाब दिसे रूपवान
म्हणूनच मान
राजाचा 4
प्रेमाचे प्रतिक
लाल गुलाब मनोहर
देती प्रेमिक
सुंदर 5
फुलतो गुलाब
काटेरुपी संकट असून
देई संदेश
हसून 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
चाराक्षरी
6 मी गुलाब
मी गुलाब
माझा दिन
नसतो मी
कधी क्षीण
रंग माझा
नसे एक
लाल श्वेत
ते अनेक
रुपाने मी
समर्पक
गंध माझा
आकर्षक
सुगंधात
गुणवंत
दरवळे
आसमंत
कधी लाल
रंगी वसे
गणेशाला
प्रिय असे
राजा असे
मी फुलांचा
नेहरूंचा
तो लाडाचा
सर्व फुले
देती मान
राजा मीच
माझी शान
वैशाली वर्तक
येथे फेब्रुवारी १६, २०२०
7
प्रजित साहित्यिक समुह
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय - गुलाबाची कळी
किती सुंदर टपोरी
रसरसलेली कळी
पहाताच चित्त वेधी
असे गुलाब पाकळी
झाले हर्षित अंगणी
कळी फुलली लाजत
काल होती बंद कळी
पाही मजला हासत
श्वेत तांबूस गुलाबी
रंग भासती मोहक
फुल शोभिवंत असे
सदा चित्तास वेधक
फिरविले बोट हळू
किती मऊ कोमलता
एक एक पाकळीत
वसे रम्य सुंदरता
काय जादू निसर्गाची
घट्ट पाकळ्या मिटल्या
म्हणतसे तिला कळी
होता उषा उमलल्या
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8
प्रज्ञा महिला मंच
विषय - मोह सुमनांचा (अष्टाक्षरी)
आवडे पुष्प
प्रसन्नता मिळे जीवा
पाहताच सुमनाला
सुगंधित आसमंत
उमलत्या त्या क्षणाला 1
मोह आवरेना कधी
रंग तयाचे मोहक
मन धावे सदाकाळ
पुष्पे चित्ताला वेधक 2
म्हणूनच देती पुष्पे
करण्यास आनंदित
पाहुनिया सुमनांना
होई रूग्ण प्रफुल्लित 3
दोन फुलले गुलाब
छान टपोरे अंगणी
मन मोहवे माळण्या रो
वाहु का? देवा चरणी 4
उगा नाही पसंतीस
भावे कमळ लक्ष्मीला
रंगे रुपाने मोहक
मोह सुमनांचा तिला
सुगंधीत मोग-याचा
मोह पाडतो गजरा
माळताच पहा कशा
वळताती त्या नजरा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
9
षडाक्षरी
गुलाब दिवस
गुलाब दिवस
दिन असे खास
प्रेम व्यक्त होई
देता हमखास
फुले ती अनेक
गुलाब मोहक
फुले बहुरंगी
तो चित्त वेधक
फुल गुलाबाचे
असे शोभिवंत
तयाच्या सुगंधे
खुले आसमंत
गुलाब रोपाचे
असती ताटवे
राजा गुलाबाचे
गातात गोडवे
सगळ्या फूलात
तोची रुपवान
मिळतो राजाचा
गुलाबास मान
फूल गुलाबाचे
प्रेमाचे प्रतिक
दिसे मनोहर
अर्पीती प्रेमिक
फुलतो गुलाब
काट्यात असून
देतसे संदेश
सदैव हसून
वैशाली वर्तक
10
अ भा म सा प समूह02
उपक्रम
चित्र काव्य
*गुलाब वर्णन*
उगीचच नव्हे तुजला मान
फुलांचा राजा म्हणून
हृदयात भरतो परिमल अन्
उमलतोस अनेक रंगातून
काय मोहक रंग रुप तव
किती रे तुज रुपाचा ठेवा
गुलाबी रंगात तर
सौंदर्याला पण वाटे तुझा हेवा
विविधता दावी रंगाची
अग्रस्थानी सौंदर्यात
पाकळ्या नाजूक सुगंधी
भासे वदती सुप्रभात
रुप तव मनोहर सुंदर
पहाताच मन होई प्रफुल्लित
परिमलाने गंधित आसमंत
करितो सकाळ उल्हासित
काय ऐटदार रुबाब तुझा
सहज भाळतात जन तव रूपास
रंगात तर आहेचा बहारदार
म्हणूनच काया राखतो काटे रक्षणास
वैशाली वर्तक
,
11
कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम क्रमांक 550
विषय. गंध फुलांचा
अर्पण करण्या देवा चरणी
गंध गुलाबाचा सांगू पाहे
सदैव मी लावितो हजरी
सौंदर्यात माझ्या ऐट आहे
फुलला टपोरा मोगरा
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान
चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न केले वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित झाले पर्यावरण
रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता
वैशाली वर्तक
अहमदाबाद
12
मुक्ताई फाउंडेशन जागतिक साहित्य मंच या चोपडा जळगाव
आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय .. मधुमालती
अंगणी उभी मधुमालती
दिसे किती कमनीय
हरित पर्णांनी बहरली
भासे सदाची विलोभनीय.
सुमने फुलली गुच्छात
श्वेत लाल रंगात फांदीवर
सुगंध दरवळे आसमंती
आनंद देई रात्र भर
रुप सुमनाचे असे सुंदर
पाच दलात फुले शोभती
येता वा-याची झुळुक
फांदीवर पुष्पे डुलती
मोहक वेणी सम गुंफणे
लांब देठ असता सुमनास
सुंदर मोहक गजरा तयार
नारींसाठी मिळण्यास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
13
ओळ काव्य
विषय -- अंगणी चाफा दरवळला
लागता चाहुल वसंताची
नानाविधी फुले फुलली
*अंगणी दरवळला चाफा*
सारी सृष्टी पहा बहरली
हिरव्या पानातूनी डोकवी
फुले चाफ्याची हळुवार
शुभ्र फुले हरित पाने
वा-यासंगे डोले अलवार
घनदाट झाड चाफ्याचे
अंगणी उभे डौलदार
करि गंधित आसमंत सारा
सदा बहरे पहा शानदार
हिरव्या चाफ्याच्या गंधाने
प्रसन्न होई वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित करि पर्यावरण
किती होती फुले पुजेस्तव
पण सोन चाफा दिसे सुंदर
मोग-या शेवंती सम तयाचे
गंधित रुप भासे मनोहर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मुक्ताई जागतिक साहित्य मंच आयोजित उपक्रम
चित्र काव्यलेखन पारिजातक
*शिकवण प्राजक्ताची*
टपोरे शुभ्र प्राजक्त
फुलले मम अंगणी
किती मोहक रूपाने
पाहता आनंद मनी
देठ शोभते केसरी
शुभ्र पाकळ्या मोहक
पडे सहज भुवरी
सडा चित्ताला वेधक.
गर्द हरित पर्णात
शोभे प्राजक्त सुंदर
सडा पाहुनिया वाटे
वेचूया ओंजळभर
अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास
घ्यावी शिकवण त्याची
उपयोगी जगण्यास
वेचली प्राजक्त फुले
अर्पिली श्रीहरी चरणी
दिसे शोभिवंत देवा-ही
आनंदात मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अभा म प सा ठाणे जिल्ला 2
आयोजित
उपक्रम
विषय - रंग
किमया निसर्गाची. विविध फुले
निसर्गाची पहा किमया
फुले फुलली विविध रंगात
लाल पिवळी श्वेत निळी
तितकीच असे नाना गंधात
फुलांचा राजा गुलाब
रंगे, रुपे, गंधे, रुबाबदार
फुलतो विविध मोहक रंगात
पहा त्याची ऐट शानदार
फुलला मोगरा श्वेतरंगी
माळिता तयाचा गजरा
गंधे चित्ताला वेधक
सहजची वळती नजरा
चाफा शेवंती कह्णेरी
असती विविध रंगात
असे मान तयांचा खास
खुलून दिसती गंध रूपात
रंगात बकुळी रातराणी
जरी पडती जरा मागे
सुगंधात आसती वरचढ
आठवणींचे विणती धागे
सारी किमया विश्वंभराची
केवढी केली सृष्टी तयार
आहे का तया निर्मीतीची भ्रांत
पण सुख दिधले आपणा अपार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भा म सा परिषद समूह 2
विषय -- फुलांचा सुगंध
*गंध फुलांचा सांगून गेला*
अर्पण करण्या देवा चरणी
गंध गुलाबाचा सांगू पाहे
सदैव मी लावितो हजरी
सौंदर्यात माझ्या ऐट आहे
फुलला टपोरा मोगरा
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान
चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न केले वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित झाले पर्यावरण
रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता
अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्व
सा -या सृष्टीत फुले कित्येक
अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्व
सा -या सृष्टीत फुले कित्येक
वैशाली वर्तक
भा म सा परिषद समूह 2
विषय -- फुलांचा सुगंध
*गंध फुलांचा सांगून गेला*
अर्पण करण्या देवा चरणी
गंध गुलाबाचा सांगू पाहे
सदैव मी लावितो हजरी
सौंदर्यात माझ्या ऐट आहे
फुलला टपोरा मोगरा
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान
चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न केले वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित झाले पर्यावरण
रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता
अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्व
सा -या सृष्टीत फुले कित्येक
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा