शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.
 .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.                                                   |त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
 परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते . अथवा जरूरी पण असते उदाहरणार्थ 
मुले मोठी झाली त्यांच्या संसारात रमली की आपण समजून उमजून अलिप्तता स्विकारण्याची 
जरूरी असते. उगाच उपदेश वा सूचन न करता अलिप्त रहाणे हितावह असते, अर्थात जरूरी असता व विचारणा होता  पण अलिप्तता दर्शनवणे पण योग्य नाही. 
   आणि दुर्लक्षता ही  कधी जाणून बुजून केली जाते वा  कधीआपल्या चुकीमुळे होते.  जेव्हा चुकीने ,तेव्हा ती निष्काळजीपणा दर्शविते. पण काही वेळा  जीवनात दुर्लक्ष करणे म्हणजेच आपल्या पुढील जनरेशन 
काय,किती  कशावर खर्च करतेय वगैरे  बारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे , हीच पायरी आहे अलिप्तता कडे 
जाण्याची वा जीवनात अलिप्तता आणण्याची .जेणे करून   नाते संबंध गोड ठेवण्याची  व जीवनाचे खरे सार समजले हे अनुभविण्याची.
       किती ही झाले तरी सर्व सामान्य माणसाचे  जीवन आंब्याच्या कोयी सारखे असते  ,कोय जशी लडबडलेली असते तसे आपण संसारात नाही म्हटले तरी लडबडलेलो असतो चिकूच्या बी प्रमाणे जगणं 
संतांना जमते पण सुषमाचेच उदा घेत सांगते  
     गॅस बाजूला केलेल्या तयारी नुसार  खीर बनणार आहे तर ती. का? कशासाठी? चे विचार न येऊ देता तेथे अलिप्तता दर्शनवणे व ऊतु जाणारे दुध ,न उतू देता , न दुर्लक्ष करीता  गॅस बंद करण्यात दक्षता दाखविणे .
दोन्ही एकाच वेळी संसारातील आंब्याची कोय. क्षणात  जरूरी प्रमाणे (चिकूची बी.)  दक्षताघेणारी होऊ शकते
 तर  अलिप्तता व दुर्लक्षता  सांभाळत जे जीवन जगतात त्यांना जीवनाचा खरा आनंद लुटता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...