मोहरली लेखणी साहित्य समूह
उपक्रम
विषय थाप
शीर्षक. थापा मारणे कला
नाही जमत सर्वांना
सत्य कमी खोटे फार
थापा मारणे ही कला
खोट्याचाच भडीमार
बालपणी खेळलोय
एप्रिल फुलचा खेळ
थापा मारिता खेळलो
मजेत गेलाय वेळ
थाप मारणे गरजेचे
कामी येते हमखास
नको कसे म्हणायचे
काम टाळताना खास
न करण्याचा शनिवार
म्हण येते की कामास
थापा मारण्याचा असे
हुकूमी एक्का वदण्यास
कसे अव्हेरू व्यक्तीला
न जमे बोलणे खोटे
करा विचार मनात
चालवा खोटे नाटे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा