गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

दिल्या मुद्यावरून कविता


दिल्या मुद्यावरून कविता 




यायची पाणी नेण्यास रोज
 एक सुंदर तरुण नार
 असेच एका दिवशी अवचित 
 दृष्टीस पडला एक सुकुमार

होई नियमित नजरा नजर
 काम करणे व्यवसाय गरजृ
पैलतीरीची पहाणे नौका  
आस लागली मना सहज

  लाडिक बटाना रूळवीत 
   होतीच नारी मनमोहक
   यौवनातील मनोभावनात
   रूप दिसे चित्त वेधक

   रोज पाणी भरण्या येणे
 झाले होते  निमित्त आता
   दृष्टी आड  रम्य निसर्ग 
  नजर  पैलतीरी येता-जाता

  सुरू झाले संवाद दोघांत
  देत घेत हातात हात
वाढत गेले आकर्षण मनी
 तयार देण्या जीवन-साथ

  डोळे लागले पैलतीरी
दोन दिवसांत नाही भेट
का बरे नाही आला सखा
आता तर भरला हृदयी थेट

इतक्यात दिसली नौका
हर्षाने  आले भरूनी ऊर
 खूप  खूप विचारांती 
 मनोमनी किती काहूर 

आनंदे वळली पावले
होता विश्वास तयावर 
 उगाच अक्षरे रेखाटली 
 वेळ जाण्या कागदावर

तूच कर्ता करविता देवा
स्मरून तुज उचलते पाऊल
लाव जीवन नौका पैलतीरी 
 दे जीवनी सुखाची चाहुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्या मुद्यावरून कविता

दिल्या मुद्यावरून कविता  यायची पाणी नेण्यास रोज  एक सुंदर तरुण नार  असेच एका दिवशी अवचित   दृष्टीस पडला एक सुकुमार होई नियमित नजरा नजर  काम ...