मंगळवार, २१ मे, २०२४

चित्र काव्य. मी तर चालले


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
पारंपारिक काव्य प्रकार 
चित्रावर आधारित कविता 

  *मी तर चालले*

सोनसळी किरणात
स्वार झाली नील परी
प्रफुल्लित उल्हासित 
मोद भरलाय उरी

पहा उत्साह दांडगा 
हास्य विलसते मुखी.
 मागे कुंतलांचा भार
भासे तीच जगी सुखी

पाय चालवी भराभर
कसली तिजला घाई
 मनी कोणा भेटण्याची 
उत्कंठा दाटलीय बाई 

वाट जाते शेतातून 
दोन्ही बाजूही हिरव्या
मंद वारा झुलवी पाती
किती भासती बरव्या

किती  रम्य  परिसर 
पण तीज नाही भान
मन मौजी होऊनिया
आहे स्वतःत रममाण 

मन झालेय उडू उडू
आली सहजच तान
दंगलेल्या चित्ती तिच्या 
ओठी स्फुरलय गान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...