स्पर्धेसाठी
जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच
साकव्य आयोजित सन्माननीय समूह सदस्या
सौ वृंदा ताई देसाई आणि या कृष्णागवस यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
विषय. गोड गैरसमज
होती तिची गोड समजूत
इडली तर तिचीचअसते खास
कधीही खावी मऊ हलकी
इडली चटणी तिची सदा हमखास.
आणि नेहमी प्रमाणे तिने
घातला ईडली करण्याचा घाट
होती खुश खुशाल मनात
इडली माझी दाविल छान थाट
केले नेहमी प्रमाणे वाटण
दिले आमंत्रण येण्या सकाळी
नास्ता माझा असेल तयार
माझी इडली चटणी असते आगळी.
पण झाला थोडा घोटाळा
स्लो बारिक गॅस चालूच रात्रभर
गडबडीत पडला विसर
वाटणाचे पातेले राहिले तयावर.
सकाळी पहाता, झाकण सारता
ती एकदम हिरमुसली
सा-या वाटण्याचा एकच ईडलेश्वर
पाहून गोड गैर समजावर हसली.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा