सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

प्रतिलिपी चे विचार साहित्य अज्ञात वारसदार


आभाळाला स्पर्शताना

#################.

असो आभाळ उत्तुंग
  मन देत असता उभारी.
आशा   मनात  यशाची.
घ्यावी बिनधास्त भरारी.

करा बळ एकवटून यत्न
असता आपण बलवंत
मनच देते वेळोवेळी  ग्वाही
होणार आपण यशवंत

होता अपेक्षा पूर्तता
आभाळाला स्पर्शण्याचा
होईल  मनी आभास
क्षण असेल आनंदाचा


काळाच्या पुढच पाऊल 

###################

घेणे उद्याचा अंदाज
असे गोष्ट योग्यच
जेणे करून जीवन
जगण्या होतो सुसज्ज

जग झालय प्रगतीशील
आयोजन चाले भविष्याचे
जगता वर्तमान  काळात
जेणे करुन जगणं होते आनंदाचे.

काळाच्या पुढच पाऊल
टाकावी लागतात सदा
तहान लागता विहीर खणणे
नसेची  योग्य  कदा

साधी मुंगी  किटक पहा
करत असते काम अविरत
पाऊस पडला तरी त्यांचे
कोठार भरलेलं सदोदित

वैशाली वर्तक

##################

पुस्तका बाहेरील ज्ञान 

खरं आहे ,झालो आपण पदवीधर
पण किती कामास येते ज्ञान जीवनभर

बहिणाबाईंना नव्हते पुस्तकी ज्ञान
पण   ख-या ज्ञानाची दिधली जगाला जाण

आमच्या आजीला नव्हते  ज्ञान पुस्तकी
पण अचूक वेळ सांगायची आम्हा नेमकी

बाळ संस्कार देऊन घडविले जीवनी
षडरिपूं  पासून दूर रहा बिंबविले मनी.

अनुभव पण हे सारे  शिकवे आपणास
अनुभवाचे गाठोडे  येते कामास

###############################

*अज्ञात वारसदार* 

अज्ञात  वारसदार 

संपत्ती मिळते वारसदारा
 आता  संपत्ती असते अपार 
 आणि वारसदार बसले परदेशात 
 नसे तयांना मोह थोडाहीफार 

अशा परिस्थितीत काय !
लाभ घेती अज्ञात वारसदार 
शेवटी देवच नशीबाने 
ज्याचे त्याचे भाग्य चमकविणार

###############$$$##########
जर वेळ विकत मिळाली 

वेळ अशी आहे की
कोणी असो. रंक वा राजा 
वेळ विकत  नाही मिळत 
किती ही करा गाजा वाजा

जितके नक्की असतात
त्याचे ठरलेले श्वास
पूर्ण होता जीवनी
सोडून जातो हमखास

##########################

चेहऱ्याविना माणूस 


चेहरा सांगतो गुज  मनीचे

दिसे  सौंदर्य चेह-या ने

नेत्र त्यावरील दावी सृष्टी

संवाद मुखातून वाणीने

चेहऱ्यात महत्वाचा
वसलाय मेंदू देहराजा
तोच  कर्ता या धडाचा
त्याचा शरीरी गाजावाजा

असे  असता  चेहऱ्यास
सर्वोपरी   अती  महत्व
चेहऱ्याविना  माणसाचे
  सांगा कसे टिकणार अस्तित्व.



######################


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाप्पा आले धावून

साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत्...