बुधवार, २४ जून, २०२६

म्हणी वरून ... प्रयत्नाती. परमेश्वर

 अभा म सा प समूह महाड तालुका

26/5/21

विषय - प्रयत्ननांती परमेश्वर


 काहीच प्रयत्न  न करिता  

नशीबात असेल तर मिळणार 

म्हणून बसता आरामात

हाती काही नाही येणार


जसे  प्रयत्न कराल कामात

यश देव देत  असतो

प्रयत्नांची करा पराकाष्ठा

हसतमुखे देव दिसतो 


 न हलवता हातपाय पाण्यात

 कसे तरुन जाणार किनारा

करिता प्रयत्न   अखंड मग

, मिळेल देवाचा सहारा


शिक्षक सांगती करा यत्न

मिळवाल सारे सुंदर  यश

राहू नका देवावर विसंबून 

येईल मग  खचितच अपयश



कितीदा पडतो खाली

साधा किटक  कोळी 

तरी प्रयत्न  न सोडी

बांधतांना त्याची जाळी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निसर्गाचे दान

 सर्व धर्म समभाव  साहित्य मंच उपक्रम  काव्य लेखन  विषय - निसर्गाचे दान चराचरात असे देव निसर्गाने दिले दान पहा किती अनमोल ठेवू सदा तयाची जाण ...