गुरुवार, २५ जून, २०२६

चित्र काव्य


 भासे हिमगिरी अचल

स्वरूप पाही जलाते 

पुन्हा पुन्हा निरखुनी

येता रवी राजे नभाते


नाना रंगी उधळण

केली रवीने  नभात 

भासे चित्ताला वेधक.

आशा देतसे मनात 


तरू जणु उभे रांगेत 

 पुष्पें पहा उमलली 

करी स्वागत रवीचे 

 भासे ऊषा हासली


केली तयाने तयार

कुठे अथांग सागर

 घनदाट ती वनराई 

तर उंच उत्तुंग शिखर

  


रूप  पाहून सृष्टीचे

 कर सहज जुळती

 किती सुंदर निसर्ग 

जाणा देवाची महती


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा. बाप्पा आले धावून

 साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत...