शनिवार, २७ जून, २०२६

कधी येशील गगनी सूर्योदय

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित  राज्यस्तरीय
काव्य लेखन स्पर्धा
क्रमांक १९
विषय - सुर्योदय 
अष्टाक्षरी रचना








शीर्षक - तुझी वाट  पहाते रे

कधी येशील गगनी 
अधीरता मनी वाटे
तम निशेचा  सारण्या  
तुझी वाट  मी पहाते      1

 आशा रुपात कळ्यांची
  फुले फुलती सकाळी
किलबील   ती खगांची 
 गोड भासेल भुपाळी         2

तुझ्या येण्याने वहाती
नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,         
मंदावती नभी तारे        3

तुज अर्घ्य देण्या उभे
 जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल
  सारे  नैराश्य मनीचे         4

फाकलेल्या  शलाकांनी
 त्या सहस्त्रकिरणांनी
तुला पहाताच मनी
 प्रसन्नता   दर्शनानी             5


स्वर्ण रंगात  येताची
मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन 
वदे "प्रभात "त्या क्षणांना      6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा. बाप्पा आले धावून

 साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत...