शनिवार, २ मे, २०२६
सुहास्य
शुक्रवार, १ मे, २०२६
मी आणि ती ( झोप)
मी आणि ती
कसे उठतात सारे लवकर
माझ्या मनी सदा खळबळ
केला मीही निश्चय उठण्याचा
अंगी एकवटून मनोबळ
केली पूर्व तयारी आधी मनाची
उठावे लागेल पहाटे सकाळी
चालणे असे सर्वोत्तम व्यायाम
पण, झोप प्रिय मज सदाकाळ
कठीण काम होते मज साठी
साखर झोप सोडणे,येई जीवाशी
तरीही केला मनाचा हिय्या
लावून गजर ठेवला उशाशी
किती कर्म कठीण ते काम
पण केलाय ना संकल्प
सकाळी उठणे आले ओघात
आता नव्हता दुसरा विकल्प
होता सकाळ वाजला गजर
*प्रिय झोपेने* ऐकले न काही
होता रोजची वेळ उठले
नजर माझी चोहीकडे पाही
ती व माझी प्रिय
कसे उठतात सारे लवकर
माझ्या मनी सदा खळबळ
केला मीही निश्चय उठण्याचा
अंगी एकवटून मनोबळ
केली होतीच मनाची तयारी
आजचा दिवस करीन खास
काही झाले तरी त्यजेन झोपेला
पूर्ण करीन संकल्प हमखास
पादत्राणे काढून ठेवली
व्यवस्थित केली, कपड्यांची तयारी
करुनच ठेवले सर्व यथायोग्य
झोपताना मिळाली मनाला उभारी
निद्रा सुख आहेच भाग्यी
स्वप्नात केले वेष परिधान
मनी वसे तेच दिसे स्वप्नी
साखर झोपेत मिळवले समाधान
सकाळच्या झोपेचे सुख
तेच जाणिती या जगती
जयांची ती असे प्रियतमा
साखर झोप का उगाचच वदती
||
कामगार दिन
शनिवार, ११ एप्रिल, २०२६
पाऊलखुणा
मंगळवार, ७ एप्रिल, २०२६
अष्टाक्षरी. वही.
रविवार, ५ एप्रिल, २०२६
अक्षर रेषा करिती सुजाण
शनिवार, ४ एप्रिल, २०२६
पंख मिळाले शब्दांना
रंगमंच
रंगमंच होते ओळख, मिळते ख्याती, कलाकाराच्या अभिनयाची जागा. समाजाचा आरसा व प्रबोधन, *रंगमंच* असे रंजनाचा धागा विष्णुदास भावे आद्य जनक, मराठी...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
जरी तू वसशी दूर वसे सख्यांच्या अंतरी तुझी प्रेमळ ती वाणी साद घालिते अधरी विविधा अध्यक्ष पद भुषविले कर्तृत्वाने सदा तयार मदतीस मित्र मं...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...
