शुक्रवार, १ मे, २०२६

मी आणि ती ( झोप)

  मी आणि ती


कसे उठतात सारे लवकर

माझ्या मनी सदा खळबळ

केला  मीही निश्चय उठण्याचा

अंगी एकवटून मनोबळ


केली पूर्व तयारी  आधी मनाची

उठावे लागेल पहाटे सकाळी 

चालणे असे सर्वोत्तम व्यायाम

 पण, झोप प्रिय मज सदाकाळ


कठीण काम  होते मज साठी

साखर झोप सोडणे,येई जीवाशी

तरीही केला मनाचा हिय्या

लावून गजर ठेवला उशाशी


किती कर्म कठीण ते काम

पण केलाय ना संकल्प

सकाळी उठणे आले ओघात

आता नव्हता दुसरा विकल्प


  होता सकाळ वाजला गजर

 *प्रिय झोपेने*  ऐकले  न काही

होता रोजची वेळ उठले

  नजर माझी चोहीकडे  पाही 




ती व माझी प्रिय


कसे उठतात सारे लवकर

माझ्या मनी सदा खळबळ

केला  मीही निश्चय उठण्याचा

अंगी एकवटून मनोबळ


  केली होतीच मनाची तयारी

आजचा दिवस करीन खास

काही झाले तरी त्यजेन झोपेला

पूर्ण करीन संकल्प हमखास 


 पादत्राणे काढून ठेवली

व्यवस्थित केली, कपड्यांची तयारी

करुनच ठेवले सर्व यथायोग्य 

झोपताना मिळाली मनाला उभारी



निद्रा सुख आहेच भाग्यी

स्वप्नात केले  वेष परिधान 

मनी वसे तेच दिसे स्वप्नी

साखर झोपेत मिळवले  समाधान 


सकाळच्या झोपेचे सुख

तेच जाणिती या जगती

जयांची ती असे प्रियतमा 

साखर झोप का उगाचच वदती






||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आणि ती ( झोप)

  मी आणि ती कसे उठतात सारे लवकर माझ्या मनी सदा खळबळ केला  मीही निश्चय उठण्याचा अंगी एकवटून मनोबळ केली पूर्व तयारी  आधी मनाची उठावे लागेल पहा...