शनिवार, ४ एप्रिल, २०२६

पंख मिळाले शब्दांना

 काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 782
विषय ..पंख मिळाले शब्दांना 
शीर्षक..  मिळते उभारी लेखणीला 

 मनी  पिंगा घाली शब्द 
 मन गुंगे विचारात 
 माळ मनी विचारांची 
 साकारली लेखनात

 शब्द शब्दास जोडून 
 वाक्ये  अनेक गुंफली
कधी काव्यात गद्यात
शब्दे साहित्यी झरली. 

मन धावे सैरा वैरा
 मिळे गती विचारांना
अंतरात येता लाटा
पंख  फुटती शब्दांना

   खेळ चालतो शब्दांचा
  शब्द येतात धावून 
   यमकी अलंकारिक 
  उचित जागा पाहून 

पंख फुटता शब्दांना
 वेळ काळ प्रसंगात
सदा रमे सारस्वत 
शब्दांच्याची गाभाऱ्यात 


वैशाली वर्तक
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काळाच्या पुढच पाऊल

घेणे उद्याचा अंदाज असे गोष्ट योग्यच जेणे करून जीवन जगण्या होतो सुसज्ज जग झालय प्रगतीशील आयोजन चाले भविष्याचे जगता वर्तमान  काळात जेणे...