रंगमंच
होते ओळख, मिळते ख्याती,
कलाकाराच्या अभिनयाची जागा.
समाजाचा आरसा व प्रबोधन,
रंगमंच असे रंजनाचा धागा
कलाकाराच्या अभिनयाची जागा.
समाजाचा आरसा व प्रबोधन,
रंगमंच असे रंजनाचा धागा
विष्णुदास भावे आद्य जनक,
मराठी रंगभूमी दिन आज.
'सीता स्वयंवर' पहिले नाट्य,
लावू आता आठवांचा ताज
मराठी रंगभूमी दिन आज.
'सीता स्वयंवर' पहिले नाट्य,
लावू आता आठवांचा ताज
रंगमंच हा होतो सुसज्ज,
ध्वनी अन् प्रकाश योजनेने.
होते चकासणी नीट सगळी,
पडदा वर सरकतो आदराने
ध्वनी अन् प्रकाश योजनेने.
होते चकासणी नीट सगळी,
पडदा वर सरकतो आदराने
करुनिया पूजा रंगमंचाची,
रंगदेवतेला करिती वंदन.
तयार होती सारे कलाकार,
जिंकावयाला प्रेक्षकांचे मन
रंगदेवतेला करिती वंदन.
तयार होती सारे कलाकार,
जिंकावयाला प्रेक्षकांचे मन
कलाकार येता रंगमंचावर,
होतो समरस भूमिकेत.
मुखवटा तो आवश्यक,
कला दर्शवण्या नाटकात
होतो समरस भूमिकेत.
मुखवटा तो आवश्यक,
कला दर्शवण्या नाटकात
समरस झालेला कलेत,
रंगमंचाचा तो कलावंत.
संपताच नाट्य दावी खरे रूप,
अन् अभिनयात ठरे यशवंत
रंगमंचाचा तो कलावंत.
संपताच नाट्य दावी खरे रूप,
अन् अभिनयात ठरे यशवंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा