शनिवार, २ मे, २०२६

सुहास्य

सुहास्य

होता मन प्रसन्न आनंदी
हास्य  लकीर उमटे मुखावर
हास्य  ही क्रियाच अशी
सहज न राही काबू मनावर

हास्य  वदन सर्वा आवडे
देती  आनंद जन मनास
निरागस  हास्य बालकाचे
पाहून वाटे चुंबावे तयास

स्मित हास्य  ठरे ओळख
राही व्यक्ती  स्मरणात
काम पण होई साध्य
 हास्यच  येई आठवात

सुहास्यावर भाळलो मी
हास्य तुझे  ते मोहक
असे येते ऐकण्यात
 ठरते हास्य चित्त वेधक

सुहास्य  असे सुगंध 
फुलाचा परिमल मंद
भासे फुललेले सुमन
देई मनास आनंद

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुहास्य

सुहास्य होता मन प्रसन्न आनंदी हास्य  लकीर उमटे मुखावर हास्य  ही क्रियाच अशी सहज न राही काबू मनावर हास्य  वदन सर्वा आवडे देती  आनंद जन मनास न...