सोमवार, २२ जानेवारी, २०२४
राम वसावा या मनी
रविवार, २१ जानेवारी, २०२४
स्नेहाचा गोडवा
KA मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित भव्य राज्यस्तरीय मकर संक्रांती निमित्त काव्यलेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय.. स्नेहाचा गोडवा
शीर्षक .. वाणीत हवा गोडवा
वाणी असता मृदुल
त्यात स्नेहाचा गोडवा
मग काय विचारता
जगी ठरतो तोची बरवा
स्नेह भाव सदा मनी
वाणीत साखर थोडी
सन्माननीय ठरतो जगती
कोण करेल उगा कुरघोडी
भारतीय संस्कृतीच अशी
देई सहज शिकवण,
वाणी महत्त्व सणातून
तिळगुळ देता जिंकती मन.
जुनी कटुता सारूनी
स्नेह तिळाचा , गुळाची गोडी
घट्ट बंधन जिव्हाळयाचे
प्रेम भावाची सदा जोडी
असे सणांचे महत्त्व
सांगे आपली संस्कृती
तीळगुळ घ्या गोड बोला
जाणा स्नेह गोडव्याची महती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शनिवार, १३ जानेवारी, २०२४
यशाचा आत्मा साहस
बुधवार, १० जानेवारी, २०२४
*मनातल्या ओळी वरून कविता
मुक्त छंद कातरवेळ
मंगळवार, ९ जानेवारी, २०२४
म्हणी वरून.... झाकली मूठ सव्वा लाखाची
रविवार, ७ जानेवारी, २०२४
स्वप्न तेचि लोचनी
वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आयोजित राज्यस्तरीय उपक्रम
उपक्रम क्रमांक 4
दि 1/1/24 ते 15/1/24
विषय ...स्वप्न तेचि लोचनी
अष्टाक्षरी
*मनीचे स्वप्न*
होता पाहिला स्वप्नात
मनातला. साथीदार
जसा हवा तसा होता
झाला आनंद अपार 1
उंच पुरा राजबिंडा
मनी भासला मिळावू
मनी भरला पाहता
वाटे जाऊनी खुणावू. 2
स्वप्नातील संवादात
विद्याधर. उमजले
*स्वप्न माझ्या लोचनीचे*
हळुवार साकारले 3
भेटलाच अवचित
केले संवाद भाषण
दिली मनाची संमती
वाढले ते आकर्षण . 4
स्वप्नात मी रंगलेली
पाहुनिया गोतावळा
जन कौतुके वदती
छान जाहला सोहळा 5
प्रातः पूजेच्या घंटेचे
ऐकू आले स्वर कानी
जागी झाले स्वप्नातूनी
क्षणार्धात आले ध्यानी. 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...






