अगदी कथन खरेच
साहस आत्मा यशाचा
विना करिता धारिष्ट्य
अशक्य तो झेंडा विजयाचा
कुठल्याही कामात
अंगी लागतेच बळ
नुसत्या पोकळ गप्पावर
मिळत नाही यशाचे फळ
करावा यश मिळवण्यास
मनाचा पक्का निर्धार
साहसाने घ्यावा निर्णय
ध्येय होणारच साकार
तेनसिंगने केले धाडस
पाऊल टाकले पथावर
न जुमानता सकटांना
गाठले एवरेस्ट शिखर
वीर सावरकरांच्या अंगी
किती होती वृत्ती धाडसी
सरळ मारली उडी सागरात
पोहचले किनाऱ्या शी
म्हणूनच वदती जन
साहस आत्मा यशाचा
मिळेल यश खचित
करिता निर्धार मनाचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा