बुधवार, १० जानेवारी, २०२४

*मनातल्या ओळी वरून कविता


*मनातल्या ओळी*
१)हरवले ते गवसले
२)ही वाट विरहाची
३)प्रारंभी पुजू बाप्पा
४)उमलण हास्य मुखी
५)ऋणानुबंधाच्या गाठी 
६)नात्यांची उजळणी,नव्यांची पायाभरणी
७)तुझ्यामाझ्यातील गाढ प्रेमाचा
८)माऊलीच्या आशीर्वादाने, कृतार्थता जीवनात
९) स्वप्न तुझे माझे
१०)स्वप्नांच्या पलीकडले
११)रोज नव्याने तुला पहावे
१२)माझे मन तुझे झाले
१३)नाते जपूया माणुसकीचे
१४)नाते मनाचे मनाशी
१५)साथ तुझी माझी
१६)समजेना कुणाला नियतीचा खेळ
१७)अबोल प्रीत ही माझी
१८)मी मला कळलोच नाही
१९)उठी उठी सूर्यनारायणा
२०)छोट्या गोष्टीतला आनंद
२१)असे कधीतरी व्हावे
२२)वेळ कुणासाठी थांबत नाही
२३) रातराणी एकांतात हरवते
२४)कुणी नाही कुणासाठी
२५)आठवणींच्या चांदण्या अन् मनी भावनांचा फुलोरा
२६)मनात चांदणे हसले
२७)प्रेमळ मनाचा सुंदर फुलोरा
२८)गंध दरवळला मनी
२९)वेड्या मनाचा कैफ कसा मांडू
३०)अशी असावीत नाती जणु गवताची पाती
३१)मन माझे वाचक झाले



स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक १७०
मनातील ओळ काव्यलेखन
ओळी वरून कविता
१०/१/२४

*ऋणानुबंधाच्या गाठी*.  

जरी सहजची वदती
कुणी  नाही कुणासाठी
नाते मनाचे मनाशी
ऋणानुबंधाच्या   गाठी.    १

साथ तुझी माझी
करू नात्यांची उजळणी
विसरुन कटूता मनातील
नव्याची पाया भरणी.                २

आठवणींच्या चांदण्या अन
मनात चांदणे हसले
मनी भावनांचा फुलोरा. 
हरवले ते गवसले.                    ३

असे कधीतरी व्हावे
छोट्या गोष्टीतला आनंद
गंधे दरवळता मनी. 
 जीवा लागला तयाचा छंद          ४

माऊलीच्या आशीर्वादाने
स्वप्नांच्या पलीकडले
स्वप्न तुझे माझे
कृतार्थता जीवनात  साकारले         ५

प्रारंभी पुजू बाप्पा
उमलण हास्य मुखी
उठी उठी सूर्यनारायणा
तव अस्तित्वाने जग सुखी.             ६

मी मला कळलोच नाही
 मनातल्या ओळी  गुंफण्यात 
मन माझे वाचक झाले
 अन् ,वाचता वाचता लिहीण्यात.      ७


वैशाली वर्तक
अहमदाबाद





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...