वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई मधे प्रकाशित
KA मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित भव्य राज्यस्तरीय मकर संक्रांती निमित्त काव्यलेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय.. स्नेहाचा गोडवा
शीर्षक .. वाणीत हवा गोडवा
वाणी असता मृदुल
त्यात स्नेहाचा गोडवा
मग काय विचारता
जगी ठरतो तोची बरवा
स्नेह भाव सदा मनी
वाणीत साखर थोडी
सन्माननीय ठरतो जगती
कोण करेल उगा कुरघोडी
भारतीय संस्कृतीच अशी
देई सहज शिकवण,
वाणी महत्त्व सणातून
तिळगुळ देता जिंकती मन.
जुनी कटुता सारूनी
स्नेह तिळाचा , गुळाची गोडी
घट्ट बंधन जिव्हाळयाचे
प्रेम भावाची सदा जोडी
असे सणांचे महत्त्व
सांगे आपली संस्कृती
तीळगुळ घ्या गोड बोला
जाणा स्नेह गोडव्याची महती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा