प्रायमरी शाळा मावळंकरांच्या जुन्या वाड्यात भरायची . एक ते सातवी पर्यंतचे वर्ग चालायचे . मुनिसिपाल्टीच्या प्रायमरी शाळा बऱ्याच आहेत . बऱ्याच एरिया प्रमाणे , आमच्या शाळे च्या बाजूला छोटी दुकाने जेथे गोळ्या , पेपरमिंट , बोरे , विलायती चिंचा घेऊन बाई बसायची . मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या .
माझ्या बाल मनास पण विकत घेण्याचे मन झाले . आई बाबा आमच्या घरी पैसे कधीच कडी कुलूपात ठेवत नव्हते . स्वयंपाक खोलीत एक भिंतींतले कपाट होते .त्यात एका पातेल्यात पैसे ठेवले असायचे . एकतर आजी घरात असायची व घरात दुसरे कोणी येणारे जाणारे नसायचेच. .
आणि परिस्थिती पण बेताची म्हणा ना त्यावेळी..खाऊन पीऊन सुखी होतो एवढेच . जराही हाय फाय नाही.
तेव्हा मी सहज त्या पातेलीतून आजीला न सांगता २ पैसे तर कधी ३ पैसे घेत गेले.
आणि कधी गोळी तर कधी काही विकत घेतले .
एक दोनदा तर आजीला पण आणून दिले . तिने विचारले ,"अग तुझ्या जवळ कुठून आली गोळी तर चक्क मैत्रिणींनी दिली असे खोटे सांगितले. असे ३/४ वेळा केले असावे ..
तरी आजी म्हणायची अग शाळा सुरु होणार ,त्याआधीच तुझ्या मैत्रिणी बरे विकत घेतात, तर मी चक्क म्हणाली , " हो ना . ,कारण त्या लांबून येतात ना .... ".. .
बिनधास्त खोटं बोलायची, पण एकदा वर्गात ,मराठी विषयात गुरुजी म्हणी शिकवत होते . त्यात एक म्हण शिकवण्यात आली ".झाकली मूठ सव्वालाखाची "
गुरुजींनी त्यावेळी काय अर्थ शिकविला तितका लक्षात नाही . पण, माझ्या मनाने मला समजविला शिकविलेला ,अथवा मनाने घेतलेला अर्थ असा की जो पर्यंत चोरी उघडकीस येत नाही तोवर ठीक आहे .
आणि मी तर रोजचं न विचारता पैसे घेत आहे व खोटे पण बोलत आहे. हे योग्य नाही
ज्यावेळी माझी ही चूक चोरी उघडकीस येईल मग काय ?
आपण पैसे न विचारता घेतले आता अशी चूक करता कामा नाही . आणि त्या दिवसा नंतर मी कधीच न सांगता पैसे घेतले नाहीत. खरच शिकवण , शिक्षण कसे माणसास घडवते हे त्या म्हणींचे ज्वलंत उदाहरण
माझ्या जीवनी ठरले.
झाकलेली मुठ मी मनात ठेवली ..तिला पुन्हा झाकलेली करण्याची गरज पडू दिली नाही. पुन्हा कधी चोरी केली नाही.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा