रविवार, ७ जानेवारी, २०२४

स्वप्न तेचि लोचनी

सायबर क्राईम


 वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आयोजित राज्यस्तरीय उपक्रम

उपक्रम क्रमांक 4

दि 1/1/24 ते 15/1/24

विषय ...स्वप्न तेचि लोचनी

     अष्टाक्षरी


     *मनीचे स्वप्न*


होता  पाहिला स्वप्नात

मनातला. साथीदार                     

जसा हवा तसा होता

झाला  आनंद अपार    1


उंच पुरा राजबिंडा

 मनी भासला मिळावू 

 मनी भरला पाहता

वाटे जाऊनी   खुणावू.   2


स्वप्नातील  संवादात

विद्याधर. उमजले 

*स्वप्न माझ्या लोचनीचे*

हळुवार साकारले             3


भेटलाच  अवचित

केले संवाद  भाषण

दिली मनाची संमती

वाढले ते आकर्षण .    4


स्वप्नात  मी रंगलेली

पाहुनिया गोतावळा

जन कौतुके वदती

छान जाहला सोहळा     5


प्रातः पूजेच्या घंटेचे   

ऐकू आले स्वर कानी

जागी झाले स्वप्नातूनी

क्षणार्धात आले ध्यानी.      6


वैशाली वर्तक

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...