सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम
९/१/२४
विषय. कातरवेळ
मन बावरे
होता रोजच सांजवेळ
करीते बघ वेणी फणी
सदा आतुर मने
तुझ्या येण्याची वाट पाही.
जीव होतो वरखाली
अजूनही का नाही आलास
वाट तुझी पहाण्याची
सदाचीच वेडी
लागली सवय ही
माझ्या मनाची
तीच झालीय रीत
अन धुंद होई प्रीत.
किती सांगायचे
असते सखया
गुज माझ्या मनीचे तुला
लक्ष न लागे कशात.
मन माझे बावरलेले
जीव गुंतता तुझ्यात
उभी राहून खिडकीशी
घेते चाहूल तव येण्याची.
वा-याची मंद झुळुक
जाते अलगत गाली स्पर्शून
अन् देते मज सांगावा
तव येण्याचा कानी हळुच.
बघ चंद्र नभीचा
त्याला पण आहे जाणीव
कसा बघतोय हसून
खोडकर भासे भारी
समजता माझी उणीव.
कसे सांगू तुला मी
मन हे झाले बावरे
ये ना आता झडकरी
सखया भेटण्या धावरे.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा