बुधवार, २१ जुलै, २०२१

माझे माहेर पंढरपूर

स्पर्धेसाठी
माझी  लेखणी ( आम्ही वारकरी)काव्य मंच
ता शहापूर  जि ठाणे महाराष्ट्र 
आयोजित 
विषय - माझे माहेर पंढरपूर 


विठुराया माझी  माऊली
विठोबा वसे ज्या नगरी
संताना  सदैव वाटे
माहेरच असे पंढरी

करी दुःख  निवारण
दृढ विश्वास तयावरी
विठुला मानती माऊली
भक्तांचा संभाळ ती करी

एकच नाम सदा ओठी
तेच आमुचे मायबाप
असती माऊलीचे रुप
दूर सारण्या भवताप


सर्व  लेकरांची माऊली
देई  ममतेची छाया
सारे भक्त भाऊ भगिनी
विठुची सर्वांवर प्रेमळ माया

असेची मानीता  भक्तांना
वाटे  पंढरपूर   हेची माहेर
भक्तांचे रहाण्याचे स्थान
जिथे मिळे सुखाचा आहेर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १९ जुलै, २०२१

भक्तीचा मळा

अ भा म सा प समूह  02
आयोजित 
उपक्रम 62
विषय -- भक्तीचा मळा
    
येता महिना आषाढ
सय येतेच वारीची
येते विठु नाम ओठी
दिसे मुर्ती माऊलीची         1

वारकरी होती गोळा
भासे  भक्तीचा तो मळा
चाले विठुचा गजर
हरी नामाचा  सोहळा        2

भजनात सारे लीन
भक्त गण होती दंग
एक मेकात पाही विठु
गाती तुक्याचे अभंग         3

चिपळ्यांच्या नाद कानी
दुम दुमली पंढरी
टाळ  बोलती  विठ्ठल
भक्ती रसाची नगरी          4


इंद्रायणी काठी पहा
   तुक्या ज्ञानाचा गजर
वैष्णवांचा जमे मळा     
सारे भक्तची हजर            5

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, १४ जुलै, २०२१

अष्टाक्षरी सार्थकी जीवन

माझी  लेखणीअष्टाक्षरी मंच
विषय - सार्थ होईल जगणे

*सार्थकी जीवन*

जन्म मानव लाभणे
असे लक्षण महान
करी सोन त्या जन्माचे
तोची खरा भाग्यवान

करु जीवन सार्थक
मानू मानवता धर्म 
 जपू माणुसकी हेची
खरे  जीवनाचे  मर्म

दीन दलीतांना देवू
सदा हात मदतीचा
एकमेका सहाय्याने 
 साथ  मिळवू प्रेमाचा

नको मिथ्या अभिमान
राखा सन्मान देशाचा
करा प्रेम देशावर
मान हवा तिरंग्याचा

असे सारे करण्यात
 होई जीवन सार्थक
नको जगणे नुसते
 प्राण्यासम  निरर्थक 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

खुलता कळी खुलेना

लालित्य नक्षत्र वेल
उपक्रम
विषय -- *खुलता कळी खुलेना*

असे काय ग झाले आज
सांग  मजवरी का रुसली
काही न बोलता कधीची
गुमसुम होऊनी बसली               1

न येती आज विचार  मनी
पाही न वळूनी मजकडे
किती मनवावे तुजला
कसे काही न सुचे  गडे              2

विषय पाहिला बदलूनी
नको पद्य तर गद्य पाहू
तुझे झरणे कर ना सुरु
अशी रुसुनी नको राहू                3

दिन एक  पण नसे शक्य
तुला न धरिले मम करी
उदासीन वाटे    दिनभर
काय करु तू सांग तरी                 4

हाश !हसली तू खुदकन
जणू चमकली नभी चांदणी
 भावना मनी स्फुरल्या बघ
धावत  आली पहा लेखणी.            5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ८ जुलै, २०२१

जगाव थोड स्वतःसाठी

यारिया  साहित्य  कला समूह 
विषय -- जगाव थोडं स्वतःसाठी


सुख शांती अन्  आनंदी आनंद 
मिळविण्या धावे मानव जन्मभर
तरी जगाव थोड स्वतःसाठी 
शोधावा जीवनी निवांत पळभर


     बालपण जाते बागडण्यात
     नसते कशाचीच   चिंता उरी
     पण  येता समज  ,  होतो मोठे
      जवाबदारीच  येते खांद्यावरी

     पेलता सावरता कौटुंबिक ओझे
     मिळत नाही निवांताचा वेळ
     तरी जगाव थोड स्वतःसाठी
     मस्त जमवावा जीवनी मेळ

   पहा पशु   विहंग शोधती क्षण
   मजेत टिपती  विहरती नभात
   कसे जगती मोदाने  स्वतःसाठी 
  रवंथ करिती पहा गुरे निवांतात

   शमवूनी अपुल्या तप्त किरणांना
  रवी जातसे अस्त   होण्याला
   जगतो   थोडे तो पण  स्वतःसाठी
   जातो अवनीच्या कुशीत निजायाला

   आयुष्याच्या  या वळणावर 
   जगाव थोडं  स्वतःसाठी
  मिळवावा निर्भेळ आनंद
  सुंदर  आयुष्य  असता गाठी


वैशाली वर्तक

सोमवार, ५ जुलै, २०२१

अभंग ..वाट किती पाहू अभंग

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह 02
काव्यस्पंदन  दैनिक  उपक्रम
विषय - वाट किती पाहू
काव्य प्रकार  - अभंग रचना

शीर्षक - 

किती वाट पाहू ।  आले मी शरण । 
करीते नमन      ।  देवराया  ।।          1

दिन निराशेचे   ।  काय अवदसा  । 
दाव कवडसा    ।  आशेचा तो      ।।     2

काय मांडियला  ।  विनाशाचा खेळ । 
कठीण ही वेळ    ।  आणियली          ।।     3


संयम  राखण्या  ।  जनांना दे बळ । 
सहण्यास झळ    । तूची देवा        ।।        4

किती वाट पाहू ।   विस्कळीत गाव  । 
मदतीस  धाव    ।  दयाधना  ।।                5

प्रसंग कठीण  ।  द्या आम्हा प्रेरणा । 
जनांना चेतना  ।  देवराया        ।।             6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अभंग....द्या आम्हा प्रेरणा / सहाक्षरी प्रेरणा भक्तीचा गजर


काव्य स्पंदन राज्यस्तरीय समूह 02
दैनिक उपक्रम
विषय - द्या आम्हा प्रेरणा
शीर्षक - *मागणे*

द्या आम्हा प्रेरणा । न खचण्या  धैर्य । 
दाखविण्या शौर्य  ।  दयाधना    ।।          1

धाव माझी  व्हावी    ।  प्रसंग तो बाका  । 
मदतीच्या हाका    ।  रक्षणाला       ।।        2

सुदृढ  आरोग्य     ।  द्यावी सदा शक्ती । 
घडो  तुझी भक्ती   ।  सदाकाळ          ।।     3

करण्या प्रगती  ।      द्या आम्हा प्रेरणा । 
वाढवा चेतना    ।  आम्हामाजी            ।।       4

व्हावे निरामय  ।   होवो    सुमंगल   । 
सुखाची चंगळ  ।  देशभर                ।।         5

 अनुभव गाठी    । वाढवा चालना
 संकट तारण्या    । प्रभोमज            ।।          6

माणुसकी जपू ।  आमचे मागणे
चांगले वागणे   ।  राहो सदा           ।।            7


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



सहाक्षरी...प्रेरणा

कोण देते पहा
प्रेरणा कोळ्याला
कितीदा पडूनी
जाळे विणण्याला            1

भाकूनी करुणा
करुनी प्रार्थना 
मिळत नसते
कधीच प्रेरणा                  2

जिजाऊ मातेची
मिळाली प्रेरणा
शिवरायांनी तो
जिंकला तोरणा                3

आटीतटीचा तो 
असतो सामना
मिळता प्रेरणा
जिंकू ही कामना                 4

मिळता प्रेरणा
उचला पाऊल 
दिसेल सदैव
यशाची चाहुल                    5

असुनी जीवनी
ओहोटी भरती
देतो ना प्रेरणा
सागर जगती                        6

वैशाली वर्तक 

अभंग 
नामदेव
विषय...गजर भक्तीचा 

गजर भक्तीचा । विठ्ठल माउली|
भक्तांना सावली| सदा साठी.  ||

रचिले लिखाण | विविध भाषेत|
गंर्थं साहेबात |. नामदेव.  ||

मंदिरी नैवेद्य | भक्तीने दावीला. |
खाण्यास लावीला  |पांडुरंगा... ||

संत नामदेव | ज्ञानाचा सागर|
मायेचा आगर |  भक्तांसाठी ||

 दावियला मार्ग | भेटण्या विठ्ठला |
पावतो सावळा |  भक्ती मार्गे. ||

नामाची पायरी | ज्ञानोबा वंदतो |
भक्तांना सांगतो | जीवभावे||




मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...