काव्य स्पंदन राज्यस्तरीय समूह 02
दैनिक उपक्रम
विषय - द्या आम्हा प्रेरणा
शीर्षक - *मागणे*
द्या आम्हा प्रेरणा । न खचण्या धैर्य ।
दाखविण्या शौर्य । दयाधना ।। 1
धाव माझी व्हावी । प्रसंग तो बाका ।
मदतीच्या हाका । रक्षणाला ।। 2
सुदृढ आरोग्य । द्यावी सदा शक्ती ।
घडो तुझी भक्ती । सदाकाळ ।। 3
करण्या प्रगती । द्या आम्हा प्रेरणा ।
वाढवा चेतना । आम्हामाजी ।। 4
व्हावे निरामय । होवो सुमंगल ।
सुखाची चंगळ । देशभर ।। 5
अनुभव गाठी । वाढवा चालना
संकट तारण्या । प्रभोमज ।। 6
माणुसकी जपू । आमचे मागणे
चांगले वागणे । राहो सदा ।। 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सहाक्षरी...प्रेरणा
कोण देते पहा
प्रेरणा कोळ्याला
कितीदा पडूनी
जाळे विणण्याला 1
भाकूनी करुणा
करुनी प्रार्थना
मिळत नसते
कधीच प्रेरणा 2
जिजाऊ मातेची
मिळाली प्रेरणा
शिवरायांनी तो
जिंकला तोरणा 3
आटीतटीचा तो
असतो सामना
मिळता प्रेरणा
जिंकू ही कामना 4
मिळता प्रेरणा
उचला पाऊल
दिसेल सदैव
यशाची चाहुल 5
असुनी जीवनी
ओहोटी भरती
देतो ना प्रेरणा
सागर जगती 6
वैशाली वर्तक
अभंग
नामदेव
विषय...गजर भक्तीचा
गजर भक्तीचा । विठ्ठल माउली|
भक्तांना सावली| सदा साठी. ||
रचिले लिखाण | विविध भाषेत|
गंर्थं साहेबात |. नामदेव. ||
मंदिरी नैवेद्य | भक्तीने दावीला. |
खाण्यास लावीला |पांडुरंगा... ||
संत नामदेव | ज्ञानाचा सागर|
मायेचा आगर | भक्तांसाठी ||
दावियला मार्ग | भेटण्या विठ्ठला |
पावतो सावळा | भक्ती मार्गे. ||
नामाची पायरी | ज्ञानोबा वंदतो |
भक्तांना सांगतो | जीवभावे||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा