गुरुवार, ८ जुलै, २०२१

जगाव थोड स्वतःसाठी

यारिया  साहित्य  कला समूह 
विषय -- जगाव थोडं स्वतःसाठी


सुख शांती अन्  आनंदी आनंद 
मिळविण्या धावे मानव जन्मभर
तरी जगाव थोड स्वतःसाठी 
शोधावा जीवनी निवांत पळभर


     बालपण जाते बागडण्यात
     नसते कशाचीच   चिंता उरी
     पण  येता समज  ,  होतो मोठे
      जवाबदारीच  येते खांद्यावरी

     पेलता सावरता कौटुंबिक ओझे
     मिळत नाही निवांताचा वेळ
     तरी जगाव थोड स्वतःसाठी
     मस्त जमवावा जीवनी मेळ

   पहा पशु   विहंग शोधती क्षण
   मजेत टिपती  विहरती नभात
   कसे जगती मोदाने  स्वतःसाठी 
  रवंथ करिती पहा गुरे निवांतात

   शमवूनी अपुल्या तप्त किरणांना
  रवी जातसे अस्त   होण्याला
   जगतो   थोडे तो पण  स्वतःसाठी
   जातो अवनीच्या कुशीत निजायाला

   आयुष्याच्या  या वळणावर 
   जगाव थोडं  स्वतःसाठी
  मिळवावा निर्भेळ आनंद
  सुंदर  आयुष्य  असता गाठी


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...