शुक्रवार, ९ जुलै, २०२१

खुलता कळी खुलेना

लालित्य नक्षत्र वेल
उपक्रम
विषय -- *खुलता कळी खुलेना*

असे काय ग झाले आज
सांग  मजवरी का रुसली
काही न बोलता कधीची
गुमसुम होऊनी बसली               1

न येती आज विचार  मनी
पाही न वळूनी मजकडे
किती मनवावे तुजला
कसे काही न सुचे  गडे              2

विषय पाहिला बदलूनी
नको पद्य तर गद्य पाहू
तुझे झरणे कर ना सुरु
अशी रुसुनी नको राहू                3

दिन एक  पण नसे शक्य
तुला न धरिले मम करी
उदासीन वाटे    दिनभर
काय करु तू सांग तरी                 4

हाश !हसली तू खुदकन
जणू चमकली नभी चांदणी
 भावना मनी स्फुरल्या बघ
धावत  आली पहा लेखणी.            5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...