स्पर्धेसाठी
माझी लेखणी ( आम्ही वारकरी)काव्य मंच
ता शहापूर जि ठाणे महाराष्ट्र
आयोजित
विषय - माझे माहेर पंढरपूर
विठुराया माझी माऊली
विठोबा वसे ज्या नगरी
संताना सदैव वाटे
माहेरच असे पंढरी
करी दुःख निवारण
दृढ विश्वास तयावरी
विठुला मानती माऊली
भक्तांचा संभाळ ती करी
एकच नाम सदा ओठी
तेच आमुचे मायबाप
असती माऊलीचे रुप
दूर सारण्या भवताप
सर्व लेकरांची माऊली
देई ममतेची छाया
सारे भक्त भाऊ भगिनी
विठुची सर्वांवर प्रेमळ माया
असेची मानीता भक्तांना
वाटे पंढरपूर हेची माहेर
भक्तांचे रहाण्याचे स्थान
जिथे मिळे सुखाचा आहेर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा