काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह 02
काव्यस्पंदन दैनिक उपक्रम
विषय - वाट किती पाहू
काव्य प्रकार - अभंग रचना
शीर्षक -
किती वाट पाहू । आले मी शरण ।
करीते नमन । देवराया ।। 1
दिन निराशेचे । काय अवदसा ।
दाव कवडसा । आशेचा तो ।। 2
काय मांडियला । विनाशाचा खेळ ।
कठीण ही वेळ । आणियली ।। 3
संयम राखण्या । जनांना दे बळ ।
सहण्यास झळ । तूची देवा ।। 4
किती वाट पाहू । विस्कळीत गाव ।
मदतीस धाव । दयाधना ।। 5
प्रसंग कठीण । द्या आम्हा प्रेरणा ।
जनांना चेतना । देवराया ।। 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा