माझी लेखणीअष्टाक्षरी मंच
विषय - सार्थ होईल जगणे
*सार्थकी जीवन*
जन्म मानव लाभणे
असे लक्षण महान
करी सोन त्या जन्माचे
तोची खरा भाग्यवान
करु जीवन सार्थक
मानू मानवता धर्म
जपू माणुसकी हेची
खरे जीवनाचे मर्म
दीन दलीतांना देवू
सदा हात मदतीचा
एकमेका सहाय्याने
साथ मिळवू प्रेमाचा
नको मिथ्या अभिमान
राखू सन्मान देशाचा
करु प्रेम देशावर
मान हवा तिरंग्याचा
असे सारे करण्यात
होई जीवन सार्थक
नको जगणे नुसते
प्राण्यासम निरर्थक
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा