रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

कंकण

कंकण
 लग्नातील एक विधी
असे बांधणे कंकण
जन्मभर देऊ साथ
याचे मनास बंधन


बांधी सैनिक कंकण
देश  सेवा रक्षणाचे
येवो कितीही संकटे
 व्रत पूर्ण  करण्याचे


हाती कंकण आनंदे
जन सेवेचे बांधिले
 फुले ज्योतिबारावांनी
सारे आयुष्य  वेचिले

येते शोभा कंकणाने 
हात  शोभून दिसती
दान देता शोभा वाढे
 संत  सदाची वदती

कंकणाची किणकिण
 सवाष्णींना सुखावते
नाद तिचा येता कानी
सखयाला खुणावते.


वैशाली वर्तक




अष्टाक्षरी वसुंधरा. /किती सोसाव्या कळ्या

अक्षर मंच
काव्य लेखन स्पर्धा 
राज्यस्तरिय  स्पर्धा  क्रमांक - ४
अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई  आयोजित


     विषय -- वसुंधरा
        वसुंधरा
पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 


सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 511
विषय..किती सोसाव्या कळा
शीर्षक....वसुंधरा 

संपताच पानगळ 
सुरू झाल्या तप्त झळा    
नको वाटे हा ऊन्हाळा  
वसुधेला अवकळा 

आला संपत ओलावा
भेगाळली मम काया
कण कण तापलेला
वृक्षांचीही नाही छाया.

झळा साहून उन्हाच्या
कोमेजली सृष्टी सारी
कसे अंकुरेल बीज
याची चिंता मनी भारी

प्रगतीच्या नावाखाली
थांबवावा आता क्षोभ.
किती सोसाव्या मी कळा
मानवाचा अती लोभ

  पंचतत्वे  मी निर्मित 
 तरी जाणा त्यांचे मोल
 जल   जिरवा  मातीत
 राखा    निसर्गाचा   तोल


 वैशाली वर्तक.
अहमदाबाद



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूर 
आयोजित काव्यलेखन उपक्रम क्रमांक 356
भूमीपूजन निमित्ताने विशेष उपक्रम 
विषय...काळी माय
   शीर्षक...वसुंधरा

जन्म दाती आई  माय
 पण जग विसावले  सारे ,
 ती पृथ्वी असे काळी माय
तिचे रुप असे न्यारे

पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430


चित्र काव्य लोभस बालिका

यारिया  साहित्य  समूह
उपक्रमासाठी
चित्र  काव्य

    **लोभस बालिका**

किती लोभस रुप पहा
मुखावरी भाव सोज्वळ
पूजेसाठी करी तयारी     
कयास तुमचा   प्रांजळ

भाळी लावियली उदी
कानी झुंबरे सुंदर  डुले
गळ्यात मोहक हार कसा
बालिकेचे रुप खुले


शोभून दिसे परकर पोलके
पारंपारिक वस्त्र परिधान
पहा कशी अवखळ बाळी
 वाटे  पाहून आगळे समाधान

भरली परडी  सुगंधित फुलांनी
लाल  रंगीत फुले डोकवली
पूजेला उणीव जयांची भासे 
 ती   तुळस पाने  पण खुडली


वैशाली वर्तक

गीत...सुखाचे सोबती

सुखाचे सोबती

जगी या सारे सोबती जाणा सुखाचे कोण ती
येतो संबध सर्वांचा     गोड  सारेची   बोलती

       होता जन्म नाते जुळे पिता माता करी माया
       सारे प्रेमाचे   सोयरे     करती प्रेमळ छाया
       कधी  पाण्यात राहूनिया  वैर  नको सांगती
       येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती


          जग बाजार स्वार्थाचा टाक जपून पाऊल 
           स्वार्थ भावे भरलेला घेत तयाची चाहुल
           दावी खोटीच माया गुणी जन सारे नसती  
           येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती

            
                

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

आवडीचा कोपरा

यारिया साहित्य  कला समूह 
उपक्रम
विषय -- माझ्या  आवडीचा कोपरा

आवडीचा कोपरा असे 
मागच्या अंगणातील खूर्ची
जिथे बसता मजला मिळे
विचारांची सदा स्फूर्ती 

  रोपे दिसती हिरवी छान
 पाने भासे टाळ्या वाजविती
वा-यासंगे हलून हासती
 भासती  मजलाच बोलाविती 

मधूनच खारुताई  धावूनी
लक्ष माझे वेधून घेई
उगाच हलवे शेपटी
स्वतःचे  आस्तित्व दावून जाई

थंड वा-याची येई झुळुक
करी मनाला प्रफुल्लित
 येती विचार मनात माझ्या 
जे करीती लिखाणास उत्तेजित

अशा निर्मळ  वातावरणी
 गुणगुणे हळुच डांस कानी
भुणभुण त्याची असता चालू 
दुर्लक्षित करते मोठ्या मनानी

वैशाली वर्तक

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

जोडीतुझी माझी. . जीवनसाथी ...ऋणानुबंध जोडीदार








अखिल  भारतीय साहित्य  संमेलन परिषद पुणे वसई शाखा
आयोजित /'स्वप्नगंध समूह
उपक्रम 
 विषय --जोडी तुझी माझी

क्षणभर न पटता ही
जोडी आपुली  आगळी 
कौतुकाने वदती जन 
जोडी तुमची जगा वेगळी

आहे प्रेम भाव सदा मनी
 ठेवी लक्ष  परस्परांचे
जरी विचारांत मतभेद 
 उणे न दावी कदा कोणाचे

पण , जरा बसता जवळी
वादाला पेटती क्षणात
जणू वैरी जन्मोजन्माचे
दुजे क्षणी प्रेम मनात

जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
रोजच येउनी नभी
ओढ लागे ती भेटीची

विश्वासाच्या धाग्याची
आहे तुझी माझी जोडी
होता किती वाद विवाद
नात्याला न कदा तोडी

वैशाली वर्तक
अहमदाबाद 










माझा तू जीवनसाथी 
किती वर्णू गुणगान 
अजूनही  तू दिसता
 विसरते देहभान 


क्षणभर न पटता ही
जोडी आपुली  आगळी 
कौतुकाने बोली जन 
जोडी ही, जगा वेगळी


 प्रेम भाव सदा मनी
 लक्ष ते परस्परांचे
 विचारांत मतभेद 
 उणे  न दावी कोणाचे


पण , येताची जवळी
वादे  पेटताती क्षणी
जणू वैरीच जन्माचे
दुजे क्षणी प्रेम मनी


जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
नभी रोजच येउनी 
ओढ लागे ती भेटीची


विश्वासाच्या या धाग्याची
आहे तुझी माझी जोडी
होता  वाद  वा विवाद
 कदा नात्याला न तोडी

आता एकच मागणे
आहे माझे  ईश्वरास
लागो न दृष्ट कधीही 
माझ्या या जोडीदारास


वैशाली वर्तक
अहमदाबाद 

जोडीदार  तितिक्षा समूह हास. पाच त्यांचं शब्द वापरुन पाठविली 
..............
माझा तू जीवनसाथी 
किती वर्णू गुणगान 
अजूनही  तू दिसता. 
 विसरते देहभान 

क्षणभर न पटता ही
जोडी आपुली  आगळी 
कौतुकाने बोली जन 
जोडी ही, जगा वेगळी

 आदरअनुराग  मनात 
 वसे नात्यात  पारदर्शकता  ,          .
 जरी विचारांत  मतभेद 
 कधी व दावीती उणीवता

पण sssयेताची जवळी
वादे  पेटताती  झणी
जणू वैरीच जन्माचे
 प्रेम  जिव्हाळा दुजेच क्षणी

जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
नभी रोजच येउनी 
ओढ लागे ती भेटीची

प्रतीबध्दता विश्वासाची 
आहे तुझी माझी जोडी
होता  वाद  वा विवाद
 कदा नात्याला न तोडी

आता एकच मागणे
आहे माझे  ईश्वरास
लागो न दृष्ट कधीही 
माझ्या या जोडीदारास



       




जीवनसाथी 


क्षणभर न पटता 
जोडी आपुली  आगळी 
कौतुकाने बोली जन 
जोडी ही, जगा वेगळी


 प्रेम भाव सदा मनी
  लक्ष ते परस्परांचे
 विचारांत मतभेद 
  उणे  न दावी कोणाचे


पण , येताची जवळी
वादे  पेटताती क्षणी
जणू वैरीच जन्माचे
दुजे क्षणी प्रेम मनी


जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
नभी रोजच येउनी 
ओढ लागे ती भेटीची


विश्वासाच्या या धाग्याची
आहे तुझी माझी जोडी
होता  वाद  वा विवाद
 कदा नात्याला न तोडी

आता एकच मागणे
आहे माझे  ईश्वरास
लागो न दृष्ट कधीही 
माझ्या या जोडीदारास


वैशाली वर्तक

अहमदाबाद 








कोकण म सा क गडचिरोली जिल्हा
आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय.. ऋणानुबंध 

शीर्षक...नाते युगायुगांचे

धुंद  एकांत या क्षणी
नको दावुस बहाणे
तुला समजण्या मीही
आता झालीय शहाणे

बघ सांजवेळ झाली
घेते हाती तव हात
तुझी माझी राहो सदा
नित्य प्रेमळ  ती साथ

स्मृती अजुनी आहेत
ताज्या  समुद्र  तटीच्या
गाज तयाची सांगते
आठवणी अंतरीच्या

 नाते हे युगायुगांचे
  ऋणानुबंधाच्या गाठी.  
  ओढ राहील सदैव
   स्नेह भाव सदासाठी.

हेच मागणे देवास
अशा एकांत क्षणाला
मार्ग सुखाचा चालूया
मिळो स्वर्ग सुख तुला

वैशाली वर्तक
अहमदाबाद


 - बंध असे रेशमाचे


बंध असे रेशमाचे
प्रेम सदा राखण्याते
दोघांच्याही मनातले
राखू सख्या जीवनाते

सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला

नाते आता झाले घट्ट
एक झाली दोन मने
वीण विणता प्रेमाची
कधी न वाटले उणे

साथ मिळता तुझीही
स्वर्ग सुख लाभे मला
वीण रेशीम गांठींची
मिळो दिर्घायु तुजला

वाटे सदाची मनात
लागो न दृष्ट नात्याला
बंध रेशमी गाठींना
हीच मागणी देवाला.

वैशाली वर्तक




जोडीदार 

माझा तू जीवनसाथी 
किती वर्णू गुणगान 
अजूनही  तू दिसता. 
 विसरते देहभान 

क्षणभर न पटता ही
जोडी आपुली  आगळी 
कौतुकाने बोली जन 
जोडी ही, जगा वेगळी

 आदरअनुराग  मनात 
 वसे नात्यात  पारदर्शकता  ,          .
 जरी विचारांत  मतभेद 
 कधी व दावीती उणीवता

पण sssयेताची जवळी
वादे  पेटताती  झणी
जणू वैरीच जन्माचे
 प्रेम  जिव्हाळा दुजेच क्षणी

जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
नभी रोजच येउनी 
ओढ लागे ती भेटीची

प्रतीबध्दता विश्वासाची 
आहे तुझी माझी जोडी
होता  वाद  वा विवाद
 कदा नात्याला न तोडी

आता एकच मागणे
आहे माझे  ईश्वरास
लागो न दृष्ट कधीही 
माझ्या या जोडीदारास


शोध सुखाचा कविता ...व लेख /सुख म्हणजे काय असत/सुख जवा एवढे

शब्दरजनी साहित्य  समुह

शोध सुखाचा


सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल 
सुख आहे संतोषात


नका करु वणवण
सुख आहे मृगजळ
 जाते  पळून दूरवर
दुःख राहते जवळ


पहा लोभस निसर्ग 
ऊषा झाली ती सुंदर 
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर

सुख आहे निसर्गात 
नभीतील चंद्र ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात

हाती  असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात

ऐका सदा संत वाणी
सांगताती  कानोकानी
नसे  कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी

सुख सुख म्हणजे  काय
रहा सदा समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी

वैशाली वर्तक






शोध सुखाचा

         जीवन भर आपण सुखाच्या  शोधात धावत असतो.  देवाला पण हेच मागणे करत असतो...... देवा सुख दे सुखी ठेव .  मोठी मंडळी पण भर भरून आशीर्वाद  देत असतात ,.... सदा सुखी रहा. मित्र मंडळी पण शुभेच्छा देत असतात  एकमेकास  प्रसंगानुसार  सुखी रहाण्याच्या. .....मग इतके सुखाच्या शुभेच्छेत नाहून निघत असताना पण,  मानव सुखाच्या शोधात धावतच असतो. 
              कोणी तरी म्हटलय, ......

         सारे जीवन संपेल
          सुख मात्र  शोधण्यात
          पण कधी उमजेल 
          सुख आहे संतोषात
      
            नका करु वणवण
            सुख आहे मृगजळ
            जाते  पळून दूरवर
            दुःख राहते जवळ.

     तर  सुखाचे असे आहे. आपण जीवनात पाहतोच .रोजचा दिन एक सारखा नसतोच आज मना सारखे सारे घडले की आनंदी होतो. हवे ते प्राप्त  झाले  हवे तिथे
हवे तसेयश मिळाले तर मन आनंदाने भरून जाते. वा काय मस्त  दिवस गेला असे वाटते. पण जर एखाद वेळी नाही घडले काम मनाजोगेश..नाही मिळाले स्पर्धेत  प्रमाणपत्र  तर लगेच मन खट्टू होते. व लगेच विचार येतो. छे..काय हे लकच नाही ...नशीबच नाही. पण आपलेच दुसरे समाधानी मन म्हणते..,अरे या वेळी महेनत कमी पडली असेल .. .ज्या प्रमाणे काम केले त्या प्रमाणात यश मिळाले ना. असे समाधानी मान सांगते. आणि तेच योग्य  आहे. समाधानात सुख असते. 
      संत लोकांनी पण सांगितले  आहे . मनी समाधान सदा बाळगा तर कधीच मन दुःखी होणार नाही.  मन समाधानाने  आपोआप  सुखी आहोत ची भावना  मनी रुजेल . दुःखा नंतर सुख येतेच जसे निशे नंतर ऊषा . ही मनाची समजूत मनास पटतेष व दुःख  दूर होते. वा जाणवत नाही म्हणजेच समाधानात दडलेले सुख आपल्यास सुख शोधण्यात कामास येते. 
       संतवाणी दोह्यात सांगतेच ना
           गोधन गजधन वाजीधन सब धन है रतन खान
            जब आवे संतोषधन सब धन धुली समान
   मग सर्वात  मोठे धन समाधान  आहे. जे सुखाचा सागर आहे.
        पहा लोभस निसर्ग 
         ऊषा झाली ती सुंदर 
         रवी राजा आला नभी
            दृश्य पहा मनोहर
             सुख आहे निसर्गात 
             नभीतील चंद्र ता-यात
              पक्षांच्या किलबिलाटात
                सुरेल मधुर संगीतात
 असा  सुंदर  निसर्ग  देवाने आपल्यास भरभरून दिला आहे तर तो पहा तयात भरलेले सौंदर्य  पहा ..त्यातच सुख दडलय.म्हणूनच
                          हाती  असलेले सुख
                          उपभोगा दिन रात
                           नका संपवू जीवन
                            सुख सुख शोधण्यात
               रामदास  स्वामी तर म्हणताच  जगी सुखी कोणीच नाही . रहा सदा समाधानी व्हाल सदा साठी सुखी

वैशाली वर्तक






सावली प्रकाशन समूह
उपक्रमासाठी
काव्यलेखन
विषय - सुख म्हणजे काय असतं
*सुख मानण्यात*

सारे जीवन संपेल
 सुख मात्र  शोधण्यात
पण कसे कधी उमजेल 
सुख तर वसे संतोषात

नका करू  वणवण
सुख  आहे मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख ची रहाते जवळ.

सुख आहे निसर्गात 
नभीतील चंद्र  ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात

*सुख म्हणजे काय असत*
रहा सदा समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी

उन्हात चालता आलेली 
वा-याची झुळुक थंड गार
देते मनाला मनस्वी आनंद
तेच असे खरे सुख अपार

हाती असलेले सुख
उपभोगा दिनरात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


सुख जवा एवढे 


काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम
25/2/23
विषय ..  सुख जवा एवढे
 
 आहे सुख दुःख जीवनी
जणु ऊन पावसाचा खेळ
जशी निशा नंतर येते ऊषा
त्याचा  बसवावा लागेल मेळ

 हवे मनी समाधान
समजवावे  आपल्या मनास 
दु:खच सदैव नसते
आठवा  सुखाच्या दिनास

 कधी न करता बाऊ
 जातील दु:खाचे दिवस
दु:ख भासेल जवा एवढे
काही न करता नवस


कुणी च नसते सुखी जगती
समर्थ सांगती सर्वोतोपरी
असंतुष्ट मनी भासे, सुख थोडे  
दु:ख भारच वहाती शीरावरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद
                                       

वरचीच कविता शीर्षक बदलून सुखाची सावली 
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
स्पर्धा क्रमांक 5
25/9/24
विषय..सुखाची सावली 
शीर्षक...*शोध सुखाचा*
(प्रकार मुक्त छंद)

सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल 
सुख आहे संतोषात



नको करू वणवण
सुख सावली मृगजळ
 जाते  पळून दूरवर
दुःख राहते जवळ

पहा लोभस निसर्ग 
ऊषा झाली ती सुंदर 
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर

सुख आहे निसर्गात 
नभीतील चंद्र ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात


हाती  असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात


ऐका सदा संत वाणी
सांगताती  कानोकानी
नसे  कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी


सुख सुख म्हणजे  काय
रहा  समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी


वैशाली वर्तक
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...