रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

अष्टाक्षरी वसुंधरा. /किती सोसाव्या कळ्या

अक्षर मंच
काव्य लेखन स्पर्धा 
राज्यस्तरिय  स्पर्धा  क्रमांक - ४
अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई  आयोजित


     विषय -- वसुंधरा
        वसुंधरा
पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 


सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 511
विषय..किती सोसाव्या कळा
शीर्षक....वसुंधरा 

संपताच पानगळ 
सुरू झाल्या तप्त झळा    
नको वाटे हा ऊन्हाळा  
वसुधेला अवकळा 

आला संपत ओलावा
भेगाळली मम काया
कण कण तापलेला
वृक्षांचीही नाही छाया.

झळा साहून उन्हाच्या
कोमेजली सृष्टी सारी
कसे अंकुरेल बीज
याची चिंता मनी भारी

प्रगतीच्या नावाखाली
थांबवावा आता क्षोभ.
किती सोसाव्या मी कळा
मानवाचा अती लोभ

  पंचतत्वे  मी निर्मित 
 तरी जाणा त्यांचे मोल
 जल   जिरवा  मातीत
 राखा    निसर्गाचा   तोल


 वैशाली वर्तक.
अहमदाबाद



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूर 
आयोजित काव्यलेखन उपक्रम क्रमांक 356
भूमीपूजन निमित्ताने विशेष उपक्रम 
विषय...काळी माय
   शीर्षक...वसुंधरा

जन्म दाती आई  माय
 पण जग विसावले  सारे ,
 ती पृथ्वी असे काळी माय
तिचे रुप असे न्यारे

पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...