कंकण
लग्नातील एक विधी
असे बांधणे कंकण
जन्मभर देऊ साथ
याचे मनास बंधन
बांधी सैनिक कंकण
देश सेवा रक्षणाचे
येवो कितीही संकटे
व्रत पूर्ण करण्याचे
हाती कंकण आनंदे
जन सेवेचे बांधिले
फुले ज्योतिबारावांनी
सारे आयुष्य वेचिले
येते शोभा कंकणाने
हात शोभून दिसती
दान देता शोभा वाढे
संत सदाची वदती
कंकणाची किणकिण
सवाष्णींना सुखावते
नाद तिचा येता कानी
सखयाला खुणावते.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा