अखिल भारतीय साहित्य संमेलन परिषद पुणे वसई शाखा
आयोजित /'स्वप्नगंध समूह
उपक्रम
विषय --जोडी तुझी माझी
क्षणभर न पटता ही
जोडी आपुली आगळी
कौतुकाने वदती जन
जोडी तुमची जगा वेगळी
आहे प्रेम भाव सदा मनी
ठेवी लक्ष परस्परांचे
जरी विचारांत मतभेद
उणे न दावी कदा कोणाचे
पण , जरा बसता जवळी
वादाला पेटती क्षणात
जणू वैरी जन्मोजन्माचे
दुजे क्षणी प्रेम मनात
जोडी जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
रोजच येउनी नभी
ओढ लागे ती भेटीची
विश्वासाच्या धाग्याची
आहे तुझी माझी जोडी
होता किती वाद विवाद
नात्याला न कदा तोडी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा