सुखाचे सोबती
जगी या सारे सोबती जाणा सुखाचे कोण ती
येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती
होता जन्म नाते जुळे पिता माता करी माया
सारे प्रेमाचे सोयरे करती प्रेमळ छाया
कधी पाण्यात राहूनिया वैर नको सांगती
येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती
जग बाजार स्वार्थाचा टाक जपून पाऊल
स्वार्थ भावे भरलेला घेत तयाची चाहुल
दावी खोटीच माया गुणी जन सारे नसती
येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा