यारिया साहित्य समूह
उपक्रमासाठी
चित्र काव्य
**लोभस बालिका**
किती लोभस रुप पहा
मुखावरी भाव सोज्वळ
पूजेसाठी करी तयारी
कयास तुमचा प्रांजळ
भाळी लावियली उदी
कानी झुंबरे सुंदर डुले
गळ्यात मोहक हार कसा
बालिकेचे रुप खुले
शोभून दिसे परकर पोलके
पारंपारिक वस्त्र परिधान
पहा कशी अवखळ बाळी
वाटे पाहून आगळे समाधान
भरली परडी सुगंधित फुलांनी
लाल रंगीत फुले डोकवली
पूजेला उणीव जयांची भासे
ती तुळस पाने पण खुडली
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा