शब्दरजनी साहित्य समुह
शोध सुखाचा
सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल
सुख आहे संतोषात
नका करु वणवण
सुख आहे मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख राहते जवळ
पहा लोभस निसर्ग
ऊषा झाली ती सुंदर
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर
सुख आहे निसर्गात
नभीतील चंद्र ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात
हाती असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात
ऐका सदा संत वाणी
सांगताती कानोकानी
नसे कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी
सुख सुख म्हणजे काय
रहा सदा समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी
वैशाली वर्तक
शोध सुखाचा
जीवन भर आपण सुखाच्या शोधात धावत असतो. देवाला पण हेच मागणे करत असतो...... देवा सुख दे सुखी ठेव . मोठी मंडळी पण भर भरून आशीर्वाद देत असतात ,.... सदा सुखी रहा. मित्र मंडळी पण शुभेच्छा देत असतात एकमेकास प्रसंगानुसार सुखी रहाण्याच्या. .....मग इतके सुखाच्या शुभेच्छेत नाहून निघत असताना पण, मानव सुखाच्या शोधात धावतच असतो.
कोणी तरी म्हटलय, ......
सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल
सुख आहे संतोषात
नका करु वणवण
सुख आहे मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख राहते जवळ.
तर सुखाचे असे आहे. आपण जीवनात पाहतोच .रोजचा दिन एक सारखा नसतोच आज मना सारखे सारे घडले की आनंदी होतो. हवे ते प्राप्त झाले हवे तिथे
हवे तसेयश मिळाले तर मन आनंदाने भरून जाते. वा काय मस्त दिवस गेला असे वाटते. पण जर एखाद वेळी नाही घडले काम मनाजोगेश..नाही मिळाले स्पर्धेत प्रमाणपत्र तर लगेच मन खट्टू होते. व लगेच विचार येतो. छे..काय हे लकच नाही ...नशीबच नाही. पण आपलेच दुसरे समाधानी मन म्हणते..,अरे या वेळी महेनत कमी पडली असेल .. .ज्या प्रमाणे काम केले त्या प्रमाणात यश मिळाले ना. असे समाधानी मान सांगते. आणि तेच योग्य आहे. समाधानात सुख असते.
संत लोकांनी पण सांगितले आहे . मनी समाधान सदा बाळगा तर कधीच मन दुःखी होणार नाही. मन समाधानाने आपोआप सुखी आहोत ची भावना मनी रुजेल . दुःखा नंतर सुख येतेच जसे निशे नंतर ऊषा . ही मनाची समजूत मनास पटतेष व दुःख दूर होते. वा जाणवत नाही म्हणजेच समाधानात दडलेले सुख आपल्यास सुख शोधण्यात कामास येते.
संतवाणी दोह्यात सांगतेच ना
गोधन गजधन वाजीधन सब धन है रतन खान
जब आवे संतोषधन सब धन धुली समान
मग सर्वात मोठे धन समाधान आहे. जे सुखाचा सागर आहे.
पहा लोभस निसर्ग
ऊषा झाली ती सुंदर
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर
सुख आहे निसर्गात
नभीतील चंद्र ता-यात
पक्षांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात
असा सुंदर निसर्ग देवाने आपल्यास भरभरून दिला आहे तर तो पहा तयात भरलेले सौंदर्य पहा ..त्यातच सुख दडलय.म्हणूनच
हाती असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात
रामदास स्वामी तर म्हणताच जगी सुखी कोणीच नाही . रहा सदा समाधानी व्हाल सदा साठी सुखी
वैशाली वर्तक
सावली प्रकाशन समूह
उपक्रमासाठी
काव्यलेखन
विषय - सुख म्हणजे काय असतं
*सुख मानण्यात*
सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कसे कधी उमजेल
सुख तर वसे संतोषात
नका करू वणवण
सुख आहे मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख ची रहाते जवळ.
सुख आहे निसर्गात
नभीतील चंद्र ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात
*सुख म्हणजे काय असत*
रहा सदा समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी
उन्हात चालता आलेली
वा-याची झुळुक थंड गार
देते मनाला मनस्वी आनंद
तेच असे खरे सुख अपार
हाती असलेले सुख
उपभोगा दिनरात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सुख जवा एवढे
काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम
25/2/23
विषय .. सुख जवा एवढे
आहे सुख दुःख जीवनी
जणु ऊन पावसाचा खेळ
जशी निशा नंतर येते ऊषा
त्याचा बसवावा लागेल मेळ
हवे मनी समाधान
समजवावे आपल्या मनास
दु:खच सदैव नसते
आठवा सुखाच्या दिनास
कधी न करता बाऊ
जातील दु:खाचे दिवस
दु:ख भासेल जवा एवढे
काही न करता नवस
कुणी च नसते सुखी जगती
समर्थ सांगती सर्वोतोपरी
असंतुष्ट मनी भासे, सुख थोडे
दु:ख भारच वहाती शीरावरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
वरचीच कविता शीर्षक बदलून सुखाची सावली
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र
स्पर्धा क्रमांक 5
25/9/24
विषय..सुखाची सावली
शीर्षक...*शोध सुखाचा*
(प्रकार मुक्त छंद)
सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल
सुख आहे संतोषात
नको करू वणवण
सुख सावली मृगजळ
जाते पळून दूरवर
दुःख राहते जवळ
पहा लोभस निसर्ग
ऊषा झाली ती सुंदर
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर
सुख आहे निसर्गात
नभीतील चंद्र ता-यात
पक्ष्यांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात
हाती असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात
ऐका सदा संत वाणी
सांगताती कानोकानी
नसे कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी
सुख सुख म्हणजे काय
रहा समाधानी जीवनी
येईल सुख घेत लोळण
मिळेल आनंद मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा