गुरुवार, ३० जुलै, २०२६

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित 
पत्र लेखन स्वरुपात कविता 
विषय ...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 



पत्राद्वारे तुजला पुसते
का मनात उगाच निराशा
बघ आला सूर्य नभात 
घेऊन सर्वांसाठी नव आशा

  शुक्र तारा घन घोर तिमीरी
तेजाळे पहा सदेव कसा
फुल कोमेजता फळ डोलते
मधुर स्वाद मिळतो असा

 सुंदर  आहेची  हे जीवन
देवे दिधलेल्या या जन्मावर 
सहर्ष करिता स्वागत
 लाव सार्थकी तू  जन्मभर 


आजचा सारा हा खटाटोप 
  मी केला.हेच सांगण्या
प्राप्त काळ असे मनोहर
कर मन आनंदी जगण्या

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित  पत्र लेखन स्वरुपात कविता  विषय ...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे  पत्राद्वारे तुजला पुसते का मनात उग...