गुरुवार, १८ एप्रिल, २०२४
लेख. ...आईचा खिसा
वसंत फुलला/गच्चीत फुलला वसंत/चाहूल वसंताची
शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४
पाणपोई
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच
लेख. अनुभुती
बुधवार, ३ एप्रिल, २०२४
चित्र काव्य. भेट शब्दातून
रविवार, २४ मार्च, २०२४
अलक होळी मर्यादा फोन वापर
*स्पर्धेसाठी*
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव निमित्ताने कविता अलक लेखन महा स्पर्धा
अलक
विषय.. होळी
झाडे कापून , वनश्रीचा -हास करून वा कोणाची जळणाची चोरलेल्या लाकडांची ...मोठ्ठी होळी पेटविण्याचा आनंद मानणे त्या पेक्षा
शिशिर ऋतूत पडलेला पानगळीचा कचरा जाळून.. पर्यावरणाची काळजी घेत, वसुंधरेला स्वच्छ करत ..वाईट दुष्ट विचारांचे दहन करणे,अंधश्रद्धेच्या विचारांचे दहन करणे. हीच
खरी सात्विक होळी आहे.चला तर प्रज्वलित करु अशी होळी.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
(गुजरात)अलक
मर्यादा
काल घरात काही विचार मत भेघदाने वाद झाले..... आवाज चढले.
दुस-या दिवशी मैना ताई लगेच नव्या सूनेला विचारत म्हणाल्या , "काय ग काल काही गडबड?"
तिने गोष्टी कडे दुर्लक्ष करत बोलणे बदलले. आईची शिकवण होती.घरच्या गोष्टी उंबरठ्या बाहेर जाता कामा नाही.
वैशाली वर्तक
मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
अलक लेखन
विषय. फोन वापर
बाबा ऑफिस मधून आल्यावर लहान मुलाला बोलले अरे मोबाईल ठेव किती तासन् तास पहातो. लगेच बायकोने त्याला गाडी चालवताना फोनवर बोलत असल्याची तक्रार पावती हाती दिली.
वैशाली वर्तक
अभंग संत विशेष...अंगणी वसंत फुलला
*स्पर्धेसाठी*
वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई
आयोजित
मराठी राज्य भाषेची एक दमदार चळवळ
माझी संस्कृती माझा अभिमान
विषय.. अंगणी वसंत फुलला
शीर्षक ... रंगोत्सव सृष्टीचा
आहे छोटेसे अंगण
पहा कसे ऐटदार
शोभा वाढवी घराची
दिसे सदा शानदार
संपताच पानगळ
रोपे सारी अंकुरली
कुठे लाल वा हिरवी
नव पर्णांनी शोभली
उभी दारीची बोगन.
स्वागताला अंगणात
येता जाता देई छाया
खुश जनता मनात
पुढे झेंडू बहरला
सदा झुकवून मान
फुले येती बारमास
पाकळ्यांची पहा शान
जुई लवुन खिडकीत
सुंगध पसरवे गात गाणी
*अंगणी बहरला वसंत*
डौलात उभी रातराणी
सृष्टी फुलली पुष्पांनी
चोहीकडे दरवळ
वसंताच्या आगमने
सात रंगी उधळण
आला ऋतू तो वसंत
बहरली राने वने
रंगोत्सव खेळे सृष्टी
मोदाने भरली जनमने
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
*स्पर्धेसाठी*
शब्द रजनी समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव निमित्ताने
कविता लेखन महास्पर्धा स्पर्धा
विषय.. वसंत प्रेमाचा
प्रकार. अभंग
शीर्षक... प्रेम ऋतू
नाम सदा ओठी | स्वप्नात रंगते |
निरस भासते. | तव वीण. ||. १
सुवास प्रीतीचा | वसंत प्रेमाचा |
हृदयी स्नेहाचा | प्रेम ऋतू. || २
गंध सुमनांचा | वसतो फुलात. |
तूची अंतरात. | क्षणोक्षणी. ||. ३
मोहक रूपाने |. लावलीस आस |
भेटण्याचा ध्यास |. लागे जीवा |. ४
मधाळ हास्याने | वेडची जीवाला. |
अधीर मनाला | करितसे. ||. ५
प्रीत ती अबोल | भेटण्या बहाणे. |
प्रेमाचे तराणे | नित्यनवे. ||. ६
वाट पाहे नभी | शुक्राची चांदणी |
तूची सदा मनी | माझा शशी. ||७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*स्पर्धेसाठी*
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव कविता लेखन महास्पर्धा
विषय. वसंत बहरला
मुक्त छंद प्रकार रचना
...........................................
ऋतू वसंत
येता ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ
दिसती केविलवाण्या तरूलता,
भासे संपली निसर्गी हिरवळ.
पण, लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली .
तरूच्या सुक्या फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली.
पहा , डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला बहावा.
लाल रंगात आकर्षक पळस
कडुलिंब शोभे हिरवा-हिरवा
राने-वने, उपवने सारी
दावी विविध सुमनांचे रंग
येता सण तो रंगाचा,
निसर्ग पण रंगउत्सवी दंग.
मोगरा ,जाई ,रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद मिळे कोकिळ कूजनाचा मनाला ,
सहा ऋतूंचे सहा सोहळे
पण, वसंताचे रुपच आगळे
बहरण्या निसर्ग सृष्टीला, वसंत
तर ,नटण्यात नसे सृष्टीला उसंत
आहे जीवनात आनंद
झटका आता मनीची मरगळ
सृष्टी देते सहज शिकवण
फुलवा मनोमनी हिरवळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...



