डौलदार बहरला
निसर्गात पानोपानी
पहा वसंत फुलला
जणु भासती झुंबरे
लाविलीत सुशोभित
करी रंग उधळण
मन झाले पुलकित
वारा तयांना झुलवे
डौलताती अलवार
भासे मोहक डौलणे
वा-याच्या तालावर
निसर्गही साधतोय
पहा रंगाची संगती
पीत फूले, हरित पाने
किती सुंदर दिसती
खरा जादुगार असे
दावी तयाची किमया
जसा बदलतो ऋतू
स्फुरे काव्य वर्णावया
वैशाली वर्तक
अहमदाबाद १७\४\२४
वसंत फुलला
मम गच्चीतली बाग
कशी राहिल वंचित
सृष्टी फुलली वसंते
गंध पसरला खचित
लाल ,गुलाबी, श्वेत
पहा जास्वंद मोहक
सोनचाफ्याचा गंध
मंजी-या सह तुळशी
बहरली तुळस छान
शोभिवंत तबकात.
वाढवी सुमनांची शान
मधोमध गुलाब राजे
झाले पहा स्थानापन्न
फेर धरून गोकर्ण
मन झाले ना प्रसन्न ?
वैशालीवर्तक
चाहूल वसंताची
येता ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ
दिसती केविलवाण्या तरूलता
भासे संपली निसर्गी हिरवळ
पण लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली
तरूच्या सुक्या फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली
पहा डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला बहावा
लाल रंगात आकर्षक पळस
कडुलिंब शोभे हिरवा हिरवा
राने वने उपवने सारी
दावी विविध सुमनांचे रंग
येता सण रंगाचा
निसर्ग पण रंगउत्सवी दंग
मोगरा जाई रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद देते कोकिळ कूजन जन मनाला
सहा ऋतूंचे सहा सोहळे
वसंताचे रुप च आगळे
बहरण्या निसर्ग सृष्टीला वसंत
तर ,नटण्यात नसे सृष्टी ला उसंत
वैशाली वर्तक
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य
आयोजित उपक्रम १४५
विषय .. ऋतू वसंत
येता ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ
दिसती केविलवाण्या तरूलता,
भासे संपली निसर्गी हिरवळ.
पण, लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली .
तरूच्या सुक्या फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली.
पहा , डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला बहावा.
लाल रंगात आकर्षक पळस
कडुलिंब शोभे हिरवा-हिरवा
राने-वने, उपवने सारी
दावी विविध सुमनांचे रंग
येता सण तो रंगाचा,
निसर्ग पण रंगउत्सवी दंग.
मोगरा ,जाई ,रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद कोकिळ कूजनाचा मनाला ,
सहा ऋतूंचे सहा सोहळे
पण, वसंताचे रुप च आगळे
बहरण्या निसर्ग सृष्टीला, वसंत
तर ,नटण्यात नसे सृष्टी ला उसंत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा