रविवार, २४ मार्च, २०२४

अलक होळी मर्यादा फोन वापर

 *स्पर्धेसाठी*

शब्द रजनी साहित्य समूह आयोजित

भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव निमित्ताने कविता अलक लेखन महा स्पर्धा


अलक

विषय.. होळी 


 झाडे कापून , वनश्रीचा -हास करून वा कोणाची जळणाची  चोरलेल्या लाकडांची ...मोठ्ठी होळी  पेटविण्याचा आनंद मानणे त्या पेक्षा 

शिशिर ऋतूत पडलेला पानगळीचा कचरा जाळून.. पर्यावरणाची काळजी घेत,  वसुंधरेला स्वच्छ करत ..वाईट दुष्ट विचारांचे दहन करणे,अंधश्रद्धेच्या विचारांचे दहन करणे. हीच  

खरी सात्विक होळी आहे.चला तर प्रज्वलित करु अशी होळी.


वैशाली वर्तक

अहमदाबाद

(गुजरात)अलक

     मर्यादा 


काल घरात काही विचार मत भेघदाने वाद झाले..... आवाज चढले.

दुस-या दिवशी मैना ताई लगेच नव्या सूनेला विचारत म्हणाल्या , "काय ग काल काही गडबड?" 

तिने गोष्टी कडे दुर्लक्ष करत बोलणे बदलले. आईची शिकवण  होती.घरच्या गोष्टी उंबरठ्या बाहेर जाता कामा नाही.


वैशाली वर्तक



मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

अलक लेखन 

विषय. फोन वापर


बाबा ऑफिस मधून आल्यावर लहान मुलाला बोलले अरे मोबाईल ठेव किती तासन् तास पहातो. लगेच बायकोने   त्याला गाडी चालवताना फोनवर बोलत असल्याची  तक्रार पावती  हाती दिली. 

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...