बुधवार, ३ एप्रिल, २०२४

चित्र काव्य. भेट शब्दातून


सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम ५५०
३\४\२४
चित्र काव्य
शीर्षक... *भेट शब्दातून* 


फुले माळली कुंतली
गळ्यात शोभे चंद्र हार
रंग अबोली अंगी खुलला
रुपवती दिसतेय नार.                १

पत्र मिळताची,आली खुशीत 
अधीर मने , करीते वाचन 
भाव मनीचे खुलले गाली 
नारी गुंतली करण्या लेखन.        २

कशी बैसली नटूनी-थटूनी
घेऊनिया हाती लेखणी 
काय लिहू, करी विचार मनी
खूश मने, दिसे देखणी.             ३
 
केले कितीदा, पत्राचे पारायण 
शब्दा शब्दांनी, मन उल्हासित   
किती कौतुकाचे, सारे शब्द 
ऊडुऊडू मने नारी आनंदित             ४

वाचण्यात  विसरली भान
लिखाणास शब्द आले अधरी
चहाचा कप तसाच ठेवूनी
विचारांचा  गुंता, सोडवी अंतरी.     ‌‌५
 
आनंदमय , तिज सकाळ,
पहा  गुलाब  गाली फुलले
शब्दातून भेटला तिचा सखा 
गुज मनीचे तया उमजले.           ६


वैशाली वर्तक
अहमदाबाद ( गुजरात)
३\४\२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...