*स्पर्धेसाठी*
वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई
आयोजित
मराठी राज्य भाषेची एक दमदार चळवळ
माझी संस्कृती माझा अभिमान
विषय.. अंगणी वसंत फुलला
शीर्षक ... रंगोत्सव सृष्टीचा
आहे छोटेसे अंगण
पहा कसे ऐटदार
शोभा वाढवी घराची
दिसे सदा शानदार
संपताच पानगळ
रोपे सारी अंकुरली
कुठे लाल वा हिरवी
नव पर्णांनी शोभली
उभी दारीची बोगन.
स्वागताला अंगणात
येता जाता देई छाया
खुश जनता मनात
पुढे झेंडू बहरला
सदा झुकवून मान
फुले येती बारमास
पाकळ्यांची पहा शान
जुई लवुन खिडकीत
सुंगध पसरवे गात गाणी
*अंगणी बहरला वसंत*
डौलात उभी रातराणी
सृष्टी फुलली पुष्पांनी
चोहीकडे दरवळ
वसंताच्या आगमने
सात रंगी उधळण
आला ऋतू तो वसंत
बहरली राने वने
रंगोत्सव खेळे सृष्टी
मोदाने भरली जनमने
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
*स्पर्धेसाठी*
शब्द रजनी समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव निमित्ताने
कविता लेखन महास्पर्धा स्पर्धा
विषय.. वसंत प्रेमाचा
प्रकार. अभंग
शीर्षक... प्रेम ऋतू
नाम सदा ओठी | स्वप्नात रंगते |
निरस भासते. | तव वीण. ||. १
सुवास प्रीतीचा | वसंत प्रेमाचा |
हृदयी स्नेहाचा | प्रेम ऋतू. || २
गंध सुमनांचा | वसतो फुलात. |
तूची अंतरात. | क्षणोक्षणी. ||. ३
मोहक रूपाने |. लावलीस आस |
भेटण्याचा ध्यास |. लागे जीवा |. ४
मधाळ हास्याने | वेडची जीवाला. |
अधीर मनाला | करितसे. ||. ५
प्रीत ती अबोल | भेटण्या बहाणे. |
प्रेमाचे तराणे | नित्यनवे. ||. ६
वाट पाहे नभी | शुक्राची चांदणी |
तूची सदा मनी | माझा शशी. ||७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*स्पर्धेसाठी*
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय वसंतोत्सव कविता लेखन महास्पर्धा
विषय. वसंत बहरला
मुक्त छंद प्रकार रचना
...........................................
ऋतू वसंत
येता ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ
दिसती केविलवाण्या तरूलता,
भासे संपली निसर्गी हिरवळ.
पण, लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली .
तरूच्या सुक्या फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली.
पहा , डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला बहावा.
लाल रंगात आकर्षक पळस
कडुलिंब शोभे हिरवा-हिरवा
राने-वने, उपवने सारी
दावी विविध सुमनांचे रंग
येता सण तो रंगाचा,
निसर्ग पण रंगउत्सवी दंग.
मोगरा ,जाई ,रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद मिळे कोकिळ कूजनाचा मनाला ,
सहा ऋतूंचे सहा सोहळे
पण, वसंताचे रुप च आगळे
बहरण्या निसर्ग सृष्टीला, वसंत
तर ,नटण्यात नसे सृष्टी ला उसंत
वैशाली वर्तक
*स्पर्धेसाठी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा