सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

मोल स्वातंत्र्याचे

उपक्रमासाठी...
काव्य निनाद साहित्य मंच,पुणे.
आयोजित 
साहित्यिक उपक्रम - ३४२
दिनांक - १४ व १५ ऑगस्ट २०२३
विषय - मोल स्वातंत्र्याचे..

 होत होते अत्याचार  अमाप
 सहावेना  जनतेला पारतंत्र्य
आपल्याच देशात  नव्हते
 आपणास   कसलेच स्वातंत्र्य 

पेटून उठले भारतीय
पेटविण्या मशाल स्वातंत्र्याची
हसतमुखे झाले उदार  जीवावर
दिली  क्रांती वीरांनी आहुती प्राणांची 

आज आपण आहोत स्वतंत्र
पण मोल जाणा त्या स्वातंत्र्याचे
सदा राहू एकजूटीने 
न विसरता ऋण क्रांती वीरांचे

आठवा त्या शहीदांना
वंदे मातरम् म्हणत चढले फाशी
व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
तिरंगा सदैव फडकत राहो आकाशी

देशप्रेम देशभक्ती ची मशाल
तेवत राहो सदा अंतरी 
स्वातंत्र्याचे  मोल जाणता
अभिमानाने मान उंचावते खरोखरी 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

काव्य बत्तीशी\ हल्ली मन फार दाटते \मने झालीत दूर

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम

काव्य लेखन

विषय .. हल्ली मन फार दाटले

     7/9/7/9


झालंय खरं असे

हल्ली मन फार दाटते

जसे वाढले वय

मन उगाच घाबरते.  1


 मुले घेण्या भरारी 

 गेली दूर परदेशात

सणवार येताची

भेटणे नाही प्रत्यक्षात.  2


नुरला साधेपणा 

दिखावा मात्र अतिशय

जन झाले नाटकी

 तीळमात्र नसे संशय. 3


 पूर्वी घरे लहान 

बदलले रहाणीमान 

आता जन दोनच

घर असते आलिशान. 4


संस्कार संस्कृतीचा

पडत चालला विसर

दाटते सारे मनी

  हे चालणार कुठवर.   5


वैशाली वर्तक

अहमदाबाद




मोहरली लेखणी साहित्य समूह 

काव्य बत्तीशी प्रकार 

विषय.. मने झालीत दूर

२७\६\२४ 

 ७\९\७\९

आहे खरे कथन.         

लोप पावला  आता काळ 

मने झालीत दूर 

स्नेह  भावनेचा दुष्काळ 


 आपापल्यात व्यस्त 

कुटुंब दिसती विभक्त 

संवाद  संपुष्टात 

होत नाही बोलून व्यक्त 


भौतिक साधनांचा 

आलाय सर्वत्रची  पूर

 हवी  जवळी सदा 

 संवादातून  केले दूर


 येता सण उत्सव 

 जमून सारे आप्त जन

भेटी गाठी घडती

 आनंदाचे  तेची ते क्षण


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


दरवळणारा स्वप्नगंध


चतुर्थ वर्धापनाचा दिन
आज  करुया साजरा
दरवळणारा स्वप्नगंध
सारस्वतांना ठेवी हासरा


हाताळले समूहाने सहज
अगणित साहित्य प्रकार
प्रशासक  हे चोखंदळ
दिधले ज्ञान आम्हा अपार

देऊन विविध विषय 
संधी दिधली दावण्या चुणुक
सारस्वतांना मिळता खाद्य
सरसावती होऊनी उत्सुक 

दरवळणारा स्वप्नगंध
सेवा माय मराठीची करितो
नको नुसते बोलणे मुखाने
प्रत्यक्षात मायभाषा वाढवितो

किती वर्णू , गावू गुणगान
असाच चालो  समूह सदैव
दरवळती अनेक समूह गंध
पण स्वप्नगंध असे एकमेव

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

लेख. चित्रावरून ललित लेखन

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
ललित लेखन चित्रावरून 
         सहजीवन

"ये ग जवळ अशी, .देतो ना मी तुला फुल माळून.  छान जमत मला."
कधीचा प्रयत्न करीत असलेल्या स्नेहाला जवळ बोलवत  रविंद्र  उद्गारला.
व शेवटी  न राहवून जवळ ओढून फुल  माळण्यात मदत रुप झालाच .
 आहेच  हे जोडपे असे.   म्हणतात ना काय ते ..made for each other.
या मनीचे त्या मनी अगदी सहजची उमजते दोघांना.
थोडक्यात काय लग्न समारंभात आप्त जनांनी व आईबाबा नी दिलेल्या शुभेच्छा.
*नांदा सौख्यभरे* अगदी तंतोतंत फळल्या आहेत असेच म्हणायचं.
किंवा दोघेही समजुतदार आहेत. एकमेकांना समजून उमजून राहणं
वागणं आहे तयांचे. रविंद्रचे तिच्या भावनांचा पूर्ण विचार करूनच   वागणे असते.
त्यात आज त्यांच्या काॅलेज च्या  मित्र मैत्रिणींचे reunion चे गेट टुगेदर होते.
कॉलेज काळात त्यांची जोडी गाजलेली होती. तेव्हा पासून मन एकमेकांना दिली होती.
रविंद्र फार विनयशील व त्याचा हाच स्वभाव स्नेहाला आवडायचा. किती हुशार आहे पण,जरा अभिमान नाही, नेहमी त्याच्या स्वभावाचे कौतुक करत असायची.
सहजीवन छान चालले होते.
रविंद्र तिच्या आवडी निवडी सतत जपायचा. तिची बॅकेत सर्विस व त्याची corporate कंपनीत चांगल्या पदावर नोकरी.त्यात त्याचे कालच pramotion झाल्याने दोघेही खुशीत होते.
तर अशा सुखी समाधानी जोडप्याचे सुखी सहजीवन होते.
दोघं तयार झाले काय योगायोग पहा किती मन जुळलेली ...दोघे तयार झाली तर मन तर जुळलेली च पण रंग संगतीत पण एकरुपता दिसली.. त्यावर स्नेहा हसून म्हणाली  
अरे,तुला कसे कळले मी लव्हेडर रंगाची साडी नेसणार. .तुझा पण रंग तोच आला.
रविंद्र हसत बोलला ,"उगा का जन म्हणतात ,"दोन तने  एक मन." आहेत आपली.
त्याने फुल माळत असता, स्नेहाने त्याला संसाराच्या वेलीवर वर फूल उमलणार आहे ही
गोड बातमी त्याला हळूच  कानात दिली. त्यामुळे दोघे अजूनही खुशीत होते.
 तेवढ्यात  गीताचे स्वर कानी आले     

  देवा दया तुझी  ही
की शुध्द दैवलीला              
लाखो न दृष्ट माझी 
माझ्याच वैभवाला

   वैशाली वर्तक
अहमदाबाद.

ऋण तयांचे

घेता जन्म मानवाने
नाते जडते कुटुंबाशी
माता पिता कुटुंब जन
मातृभूमी मातृभाषेशी

 ऋणी मी पण  सा-यांचा
 देणे लागतो गुरु जनांचे
माता पितांनी केले मोठे
सारे श्रेय कुटुंबियांचे

समाजाचे पण असती ऋण
ज्या लोकांत वावरलो
समाजाच्या गरजा पुरविण्या
त्यांचा मी ऋणी लागतो

मातृभूमी कुशीत जियेच्या
वाढलो घडलो कर्तृत्ववान
राहणार सदैव ऋणी तीयेचे
पूर्ण करू  स्वच्छतेचे अभियान 


फेडणे असेची अशक्य 
ऋण  माता पिताचे मजवर
 ईश्वराने दिधला मानव जन्म
ऋण तयाचे.  जन्मभर

वैशाली वर्तक
अहमदाबाद 



निवांत

 साकव्य काव्य स्पर्धा 26

स्पर्धेसाठी

विषय ... निवांत 


शांत शांत अगदी निशांत

क्षण फिरुनी यावे निवांत


 सुख, शांति  अन् आनंद ,

  मिळविण्याचा असे छंद

  सारे वसती  आपुल्याच  मनात

  क्षण फिरुनी यावे निवांत.            1


मन शोधी सदैव शांती                

जीवाला न कदापि भ्रांती 

वाटे मनाला हवा एकांत

क्षण फिरुनी यावे निवांत                 2             

                    

 मजेत  विहरती पहा विहंग

 गुरे  निवांतात  करीती रवंथ

कसा मिळतो क्षण तया शांत

 क्षण फिरुनी यावे निवांत.                3

                                                  .      

तप्त किरणांना  शमवून

जातो धरेच्या कुशीत लपून

येतो गगनी शशीकांत

क्षण फिरुनी यावे निवांत.                 4


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सोमवार, ३१ जुलै, २०२३

म्हणीवरुन ......अती तेथे माती ...शितावर भाताची परीक्षा


 अ भा म सा पण ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम

विषय.  अती तेथे माती


सर्वच  हवे आटोक्यात

अती होता घडे विनाश

जलधारा जरी गरजेच्या

 जास्त होता दिसे सर्वनाश


सकस आहार असे जरुरी

सेवन करता नको अधाशी

बिघडते स्वास्थ अती प्रमाणात 

रहा मग दोन दिवस उपाशी


संयम हवाच मनाला

उठता बसता सदा पाळावा

जगणे करण्या आनंददायी

कटाक्षाने अती लोभ टाळावा


 विज्ञानाने जीवन सुखी

पण नका होऊ अहारी

दुष्परिणाम त्यांचे होता

जीवनात  संकटे भारी


असूद्या सवय कामाची

स्वास्थ्यासाठी गरज

मेद वाढता शरीराचा

सय  येते जिमची  सहज



वैशाली वर्तक

अहमदाबाद






वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई 


*शितावरून भाताची परीक्षा* 



अगदी उचित म्हण असे

न उकरता पूर्ण भाताला 

पहाण्या शिजला का भात

एक शीतच उत्तरते  हाताला


गृहिणी होतात तरबेज 

त्यांना कळे अनुभवे सहज

ताटलीत भात काढणे

कधीच नसे गरज


त्यावरून  म्हण व्यवहारात 

पकडली सदैव वचनी (मुखी)

एका शिताच्या प्रशिक्षणे

समजा कसे वागावे जीवनी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...