घेता जन्म मानवाने
नाते जडते कुटुंबाशी
माता पिता कुटुंब जन
मातृभूमी मातृभाषेशी
ऋणी मी पण सा-यांचा
देणे लागतो गुरु जनांचे
माता पितांनी केले मोठे
सारे श्रेय कुटुंबियांचे
समाजाचे पण असती ऋण
ज्या लोकांत वावरलो
समाजाच्या गरजा पुरविण्या
त्यांचा मी ऋणी लागतो
मातृभूमी कुशीत जियेच्या
वाढलो घडलो कर्तृत्ववान
राहणार सदैव ऋणी तीयेचे
पूर्ण करू स्वच्छतेचे अभियान
फेडणे असेची अशक्य
ऋण माता पिताचे मजवर
ईश्वराने दिधला मानव जन्म
ऋण तयाचे. जन्मभर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा