मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम
काव्य लेखन
विषय .. हल्ली मन फार दाटले
7/9/7/9
झालंय खरं असे
हल्ली मन फार दाटते
जसे वाढले वय
मन उगाच घाबरते. 1
मुले घेण्या भरारी
गेली दूर परदेशात
सणवार येताची
भेटणे नाही प्रत्यक्षात. 2
नुरला साधेपणा
दिखावा मात्र अतिशय
जन झाले नाटकी
तीळमात्र नसे संशय. 3
पूर्वी घरे लहान
बदलले रहाणीमान
आता जन दोनच
घर असते आलिशान. 4
संस्कार संस्कृतीचा
पडत चालला विसर
दाटते सारे मनी
हे चालणार कुठवर. 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह
काव्य बत्तीशी प्रकार
विषय.. मने झालीत दूर
२७\६\२४
७\९\७\९
आहे खरे कथन.
लोप पावला आता काळ
मने झालीत दूर
स्नेह भावनेचा दुष्काळ
आपापल्यात व्यस्त
कुटुंब दिसती विभक्त
संवाद संपुष्टात
होत नाही बोलून व्यक्त
भौतिक साधनांचा
आलाय सर्वत्रची पूर
हवी जवळी सदा
संवादातून केले दूर
येता सण उत्सव
जमून सारे आप्त जन
भेटी गाठी घडती
आनंदाचे तेची ते क्षण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा