साकव्य काव्य स्पर्धा 26
स्पर्धेसाठी
विषय ... निवांत
शांत शांत अगदी निशांत
क्षण फिरुनी यावे निवांत
सुख, शांति अन् आनंद ,
मिळविण्याचा असे छंद
सारे वसती आपुल्याच मनात
क्षण फिरुनी यावे निवांत. 1
मन शोधी सदैव शांती
जीवाला न कदापि भ्रांती
वाटे मनाला हवा एकांत
क्षण फिरुनी यावे निवांत 2
मजेत विहरती पहा विहंग
गुरे निवांतात करीती रवंथ
कसा मिळतो क्षण तया शांत
क्षण फिरुनी यावे निवांत. 3
.
तप्त किरणांना शमवून
जातो धरेच्या कुशीत लपून
येतो गगनी शशीकांत
क्षण फिरुनी यावे निवांत. 4
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा