अ भा म सा पण ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय. अती तेथे माती
सर्वच हवे आटोक्यात
अती होता घडे विनाश
जलधारा जरी गरजेच्या
जास्त होता दिसे सर्वनाश
सकस आहार असे जरुरी
सेवन करता नको अधाशी
बिघडते स्वास्थ अती प्रमाणात
रहा मग दोन दिवस उपाशी
संयम हवाच मनाला
उठता बसता सदा पाळावा
जगणे करण्या आनंददायी
कटाक्षाने अती लोभ टाळावा
विज्ञानाने जीवन सुखी
पण नका होऊ अहारी
दुष्परिणाम त्यांचे होता
जीवनात संकटे भारी
असूद्या सवय कामाची
स्वास्थ्यासाठी गरज
मेद वाढता शरीराचा
सय येते जिमची सहज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई
*शितावरून भाताची परीक्षा*
अगदी उचित म्हण असे
न उकरता पूर्ण भाताला
पहाण्या शिजला का भात
एक शीतच उत्तरते हाताला
गृहिणी होतात तरबेज
त्यांना कळे अनुभवे सहज
ताटलीत भात काढणे
कधीच नसे गरज
त्यावरून म्हण व्यवहारात
पकडली सदैव वचनी (मुखी)
एका शिताच्या प्रशिक्षणे
समजा कसे वागावे जीवनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा