आज करुया साजरा
दरवळणारा स्वप्नगंध
सारस्वतांना ठेवी हासरा
हाताळले समूहाने सहज
अगणित साहित्य प्रकार
प्रशासक हे चोखंदळ
दिधले ज्ञान आम्हा अपार
देऊन विविध विषय
संधी दिधली दावण्या चुणुक
सारस्वतांना मिळता खाद्य
सरसावती होऊनी उत्सुक
दरवळणारा स्वप्नगंध
सेवा माय मराठीची करितो
नको नुसते बोलणे मुखाने
प्रत्यक्षात मायभाषा वाढवितो
किती वर्णू , गावू गुणगान
असाच चालो समूह सदैव
दरवळती अनेक समूह गंध
पण स्वप्नगंध असे एकमेव
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा