रविवार, २९ जानेवारी, २०२३

या झोपडीत माझ्या

या झोपडीत माझ्या

या झोपडीत माझ्या,वाहे आनंद वारे
अलिशान महालासम वातावरण सारे

 मनाची श्रीमंती येथे दिसे क्षणोक्षणी
समाधानी वृती भरली मनोमनी 

अतिथी देवो भव मंत्र गुंजतो कानी
 माणुसकी हा धर्म राही सदा ध्यानी

    वागणुक  खेळीमेळीची असे सदा सर्वदा  
    अहंकार  मी पणा  दिसत नाही कदा

    थंड वा-याची झुळूक मनी देई आनंद
    बहरलेल्या फुलांचा वाहे सुगंध मंद

    जरी नाही भपका श्रीमंती पैशाचा
     समाधानात आनंद मिळे सुखाचा

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

असेअसावे नवे वर्ष/सुखयेवो नव वर्षी/ संकल्प नव वर्षाचा\वर्ष संपता

अ भा म सा परिषद समूह  आयोजित काव् लेखन स्पर्धा 
विषय -- असे असावे नवे वर्ष

फार सोसले गतवर्षी
सदा जगलो चिंता ग्रस्त
नको आता तसे काही
जगुया सारे बिनधास्त

निसर्गाची मिळावी साथ
योग्य  प्रमाणात पडावे पाणी
हिरवी  शिवारे फुलावीत
 बळीराजा आनंदे गाईल गाणी

 कधी न व्हावी भृणहत्या
  राखावा नारींचा मान
  दिसावेत वृद्ध आनंदात
  तयांचा  होत असावा सन्मान

  आत्मनिर्भर होऊ सारे
  देशाची वाढो  जगती शान
 माणुसकी हाच धर्म खरा
 याची नागरिकांना राहो जाण
 
असे सारे घडावे नव वर्षी
आनंदाची वाहील सरिता
गतवर्षीची विसरुनी कटुता
उत्साहाची  लिहूया कविता

वैशाली वर्तक




अष्टाक्षरी
सुखी येवो नव वर्ष
स्पर्धेसाठी
    
कधी संपेल हा काळ
जन त्रासले अपार
सुख येवो नव वर्षी
हीच इच्छा मनी फार


घडो भेटी  त्या आप्तांच्या
सुख नांदो या जगती
येवो  उल्हास जीवनी
होवो जगाची प्रगती

करु नवीन संकल्प 
वाहो उत्साहाचे वारे
आत्म निर्भर बनूया
 सुखी सदा राहू सारे


नको कटु आठवणी
होवो सुखे सुरुवात
 सुख येवो नव वर्षी
आनंदाची बरसात

करु स्वागत नव्याचे
मोद मिळो या वर्षात
सारे जन जगातील
राहो सदाची हर्षात

वैशाली वर्तक
अहमदाबाद


सावली प्रकाशन  समुह 
विषय -- नववर्षाचा संकल्प
   
       *          *संकल्प*
    करु स्वागत  नव्या वर्षाचे
    हर्ष  उल्हासाच्या जल्लोषात
    उगवतीचा  भास्कर  देई रोज
    नव्या आशा अन् दिशा जीवनात 

    पर्यावरणाची घेऊ काळजी
    देऊया लक्ष वृक्षा रोपणी
   वसुंधरेची वाढवण्या शान
    करु नवे संकल्प  जीवनी
      
      जागवुया मानवता मनातूनी
      माणुसकी हाच धर्म खरा
      विसरुनी भेदभाव सारे
      संकल्पाने वाहेल झरा
      
       संकल्प नारी सन्मानाचा
       भृणहत्या नकोची कदा
       स्त्री  शिक्षणावर देऊ भार
       प्रगतीशील होवो देश सदा
     
वैशाली वर्तक
  
       

वैशाली वर्तक




सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम क्रमांक 540








काव्य प्रकार ..ओळ काव्यलेखन 
विषय..नवं वर्ष मनी हर्ष

*नव वर्ष मनी हर्ष*
आतुरता स्वागताची
चालू वर्ष संपताच
 दिसे उत्कंठा नव्याची


झाल्या चुकां सुधारूनी
नको त्यांची उजळणी 
ध्यानी घेऊया नव्याने 
शाळा अनुभवी  मनी

देऊ निरोप वर्षाला
नव्या हर्ष उल्हासाने
नव वर्ष स्वागताला 
उत्साहाच्या अत्तराने

करू नवीन संकल्प 
वाहो उत्साहाचे वारे
आत्म निर्भर बनूया
 सुखी सदा राहू सारे


नको कटूआठवणी
होवो सुखे सुरुवात
 सुख येवो नव वर्षी
आनंदाची बरसात

करू स्वागत नव्याचे
मोद मिळो या वर्षात
सारे जन जगातील
राहो सदाची हर्षात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




वर्ष संपता 

प्रथम नंबर लागला  जगात
चंद यानने  दक्षिण ध्रुवावर
गौरव आपल्या देशाचा
तिरंगा फडकला चंद्रावर

संपत येता साल तेवीस
आतुरता नव वर्षाची 
काय मिळविले काय गवसले
विचारणा मनी वर्ष भराची


निसर्गाची मिळावी साथ
योग्य  प्रमाणात पडावे पाणी
हिरवी  शिवारे फुलावीत
 बळीराजा आनंदे गाईल गाणी


 कधी न व्हावी भृणहत्या
  राखावा नारींचा मान
  दिसावेत वृद्ध आनंदात
  तयांचा  होत असावा सन्मान


  आत्मनिर्भर होऊ सारे
  देशाची वाढो  जगती शान
 माणुसकी हाच धर्म खरा
 याची नागरिकांना राहो जाण


असे सारे घडावे नव वर्षी
आनंदाची वाहील सरिता
गतवर्षीची विसरुनी कटुता
उत्साहाची  लिहूया कविता


वैशाली वर्तक





सोमवार, २३ जानेवारी, २०२३

गीत धाव दयाघना (कोरोनात)

धाव दयाघना

मरणाचे अंक ।   विचलित मन ।  
भयभीत  जन  । सर्वत्र ची     ।।        धृपद

उजाड नगरे ।  अवकळा आली । 
 झळाळी उडाली ।  नगरांची     ।। 
दिन निराशेचे  । आली अवदसा । 
दिसो कवडसा । आशेचा तो ।। 
         मरणाचे अंक  विचलत मन


काय मांडियला ।  विनाशाचा खेळ । 
कठिण ही वेळ । आणियली  ।। 
दुःखाची ही निशा  ।  संपवावी आता । 
चरणी हा माथा  ।  ठेवीतसे ।। 
      मरणाचे अंक  विचलत मन                 2


संयम राखण्या  ।  जनांना दे बळ । 
सहण्यास झळ । तूची देवा     ।। 
क्षणोक्षणी घाव ।  बिथरले गाव । 
मदतीस धाव । दयाघना    ।।
               मरणाचे अंक                        3

वैशाली वर्तक
अहमदाबाद
17/4/21

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

बालदिन

बालविश्व साहित्य मंच
बालदिनानिमित्त काव्य लेखन
विषय ....बालदिन
  
     
 लहान मुलं असती प्रिय
 मुले भासती लोभस
 आवडती सर्व जनांना 
 मनाने असती ती निरागस

मनी नसती   हेवेदावे
 जे दिसे वाटे  त्या आपुले
मस्त रमती खेळ खेळता
 न मिळता दावी वाकुले

  जन्म दिन नेहरुचाचांचा
  बालदिन नावे  करती साजरा 
 ठेवू त्यांना सदा आनंदी
  पाहू त्यांचा चेहरा हासरा


देऊनी योग्यची संस्कार 
तेच उद्याचे  देशाचे  शिल्पकार
बनवू त्यांना उत्तम नागरिक
भारतभूला उज्वल करणार
 

  मन धावे बालपणात
  प्रत्येकात वसे बालक
कधी  मनातून भाव जागती
  जरी झालो आता पालक

वैशाली वर्तक
अहमदाबाद

भरारी पतंगा सारखी

अ भा म भा प समूह2
आयोजित
उपक्रम
विषय ..भरारी  पतंगासारखी

पाहूनिया  पतंगास
 मनी मिळते उभारी
 आता होता भूमीवर
घेतली की उंच भरारी

जातो वर वर नभात
येता जरी अडचणी
 मात करीतो  त्यांना
शोभे डौलात गगनी

 जीवन असते असेच
 खेळ उन पावसाचा
न होता कधी हतबळ
यत्न हवा नित्य नेमाचा

 मनी हवी प्रबळ ईच्छा
 अपेक्षा हवी यशाची
 तीच देते मनाला उभारी
 पतंगासम उंच जाण्याची


 चढ उतार जीवनी
येणार हे तर खचित
करा मनापासून यत्न
 भरारी घेणे हे उचित

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

काव्य बत्तीशी.. आयुष्यात प्रत्येक क्षण./ कठीण समय येता\सहज गुंफले काव्यात

मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.... आयुष्यात प्रत्येक क्षण 
9/7/9/7

जन्म  मृत्यूतील अंतर. 
असे आयुष्य काळ.      
उपभोगा प्रत्येक क्षण
येता नवी सकाळ.  

मानव जन्म हा लाभला.  
जगुया आनंदाने
करूया सोने आयुष्याचे
दिले आयु देवाने

निशेत दडली पहाट.  
दु:खा नंतर सुख
नसे तिमीर सदाकाळ 
रहा हसत मुख


गाणे देई मना आनंद
भरू स्वर मनात
होता संगीतमय जीव
व्यथा दूर क्षणात

आयुष्यात प्रत्येक क्षण
असे आगळा नवा 
नका बाळगू खंत मनी
उत्साह मात्र हवा

वैशाली वर्तक
अहमदाबाद


मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.. कठीण वेळ येता

 9/7/9/7

कठीण समय येताची
कोणी नसे जवळ
खरेची असते कथन
उचित  ते केवळ

 तोची असतो करविता.  
  करा धावा देवाचा
दुर करण्या अशावेळी 
 तोची असे कामाचा

  खरा मित्र  कळे तेव्हाची
  येता कठीण वेळ
उभा राही  तरी पाठीशी 
     करी  मैत्रीचा मेळ       

 संकट समयी रहावे
  द्यावी  मित्रास साथ
आनंदात सारेची 
देतातच  हातात हात

वैशाली वर्तक

अहमदाबाद

सहज गुंतले काव्यात 



शब्द आले अधरी
सहज गुंफले काव्यात
साकारली कविता
वाढ नव्याने साहित्यात

छंदची जडलाय 
रमणे सदैव शब्दात 
नकळत रचते
 कविता विविध रसात

 गुंफितेय शब्दांची
माळ मी नित्य नियमित 
आहे काव्य बत्तीशी
प्रकार झाला प्रचलित 

आवडला मजला 
 अश्विनी आहे रचियता
प्रचलित करुया
झालाय की नामांकित

वैशाली वर्तक 


मोहरली लेखणी साहित्य मंच 
काव्य बत्तीशी प्रकार 
विषय..सामर्थ्य 
७\९\७\९

यशासाठी दाखवा 
स्वतःचे  सामर्थ्य जीवनी
 सारूनिया आळस
 राखा धाडसी वृत्ती मनी
 
 मन दृढनिश्चयी, 
 एकाग्रता हवी कामात 
सामर्थ्य दाखवेल 
 यशफळ देते हातात 

उगाच का म्हणती 
सामर्थ्य हे चळवळीचे 
यत्न करीता जना
    फळ मिळे यशप्राप्तीचे

कवींच्या लेखणीत
बळ असते सामर्थ्याचे
 मना मिळे चैतन्य 
  सदैव उज्वल यशाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

चित्र कविता

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
उपक्रम क्रमांक 485
विषय ....चित्र काव्य

दोन गोड छकुल्यांना
सोडण्या शाळेला वेळेवर
पहा हसतमुखाने पिता
स्वार झाला सायकलवर.

शाळेचा गणवेष टापटीप
केली वेणी फणी आईने 
मागे वळूनी निरोप देता
घेतले दप्तर पाठीला ताईंने.

लेकी शिकूनी सवरुनी
तयार व्हाव्यात  साक्षर
मनी दृढ आशा आईची
शोभतील उच्च पदावर

 साधी राहणी  कुटुंबाची
 उच्च भावना विचारात
 सुसंस्कृत करूनी मुलींना
 भरारी घेण्या जीवनात .

हिरवळ आहे दाटलेली
केळीचे लांब लांब पान
झुकलेली डोक्यावर
पडवीत शोभती छान.

सुखी समाधानी भाव
दिसताती मुखावरी
होवो स्वप्न पूर्ती त्यांची
हेच शब्द येती अधरी.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...