मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.... आयुष्यात प्रत्येक क्षण
9/7/9/7
जन्म मृत्यूतील अंतर.
असे आयुष्य काळ.
उपभोगा प्रत्येक क्षण
येता नवी सकाळ.
मानव जन्म हा लाभला.
जगुया आनंदाने
करूया सोने आयुष्याचे
दिले आयु देवाने
निशेत दडली पहाट.
दु:खा नंतर सुख
नसे तिमीर सदाकाळ
रहा हसत मुख
गाणे देई मना आनंद
भरू स्वर मनात
होता संगीतमय जीव
व्यथा दूर क्षणात
आयुष्यात प्रत्येक क्षण
असे आगळा नवा
नका बाळगू खंत मनी
उत्साह मात्र हवा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.. कठीण वेळ येता
9/7/9/7
कठीण समय येताची
कोणी नसे जवळ
खरेची असते कथन
उचित ते केवळ
तोची असतो करविता.
करा धावा देवाचा
दुर करण्या अशावेळी
तोची असे कामाचा
खरा मित्र कळे तेव्हाची
येता कठीण वेळ
उभा राही तरी पाठीशी
करी मैत्रीचा मेळ
संकट समयी रहावे
द्यावी मित्रास साथ
आनंदात सारेची
देतातच हातात हात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सहज गुंतले काव्यात
शब्द आले अधरी
सहज गुंफले काव्यात
साकारली कविता
वाढ नव्याने साहित्यात
छंदची जडलाय
रमणे सदैव शब्दात
नकळत रचते
कविता विविध रसात
गुंफितेय शब्दांची
माळ मी नित्य नियमित
आहे काव्य बत्तीशी
प्रकार झाला प्रचलित
आवडला मजला
अश्विनी आहे रचियता
प्रचलित करुया
झालाय की नामांकित
वैशाली वर्तक
मोहरली लेखणी साहित्य मंच
काव्य बत्तीशी प्रकार
विषय..सामर्थ्य
७\९\७\९
यशासाठी दाखवा
स्वतःचे सामर्थ्य जीवनी
सारूनिया आळस
राखा धाडसी वृत्ती मनी
मन दृढनिश्चयी,
एकाग्रता हवी कामात
सामर्थ्य दाखवेल
यशफळ देते हातात
उगाच का म्हणती
सामर्थ्य हे चळवळीचे
यत्न करीता जना
फळ मिळे यशप्राप्तीचे
कवींच्या लेखणीत
बळ असते सामर्थ्याचे
मना मिळे चैतन्य
सदैव उज्वल यशाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा